Fertilizer Management: खत वितरण प्रणालीच्या पथदर्शी प्रकल्पासाठी राज्यातून छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत शुक्रवारपासून (ता. ५) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या नव्या प्रणालीची माहिती प्रभावीपणे पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहेत..जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच खत वितरण प्रणालीच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते..Farmer ID Mandatory: सातारा जिल्ह्यात खत वितरणासाठी ‘फार्मर आयडी’ बंधनकारक.बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गवळी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित खत वितरणासाठी ‘नॅशनल फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे..Fertilizer Stock: बुलडाण्यात खरिपासाठी १.७ लाख टन खतसाठा उपलब्ध....असे होईल कामॲपद्वारे अनुदानित खत शेतकऱ्याच्या पसंतीच्या कृषी सेवा केंद्रावर बुक केल्यानंतर प्रणालीमध्ये एक क्यूआर कोड निर्माण होईल. बुक केलेले खत तीन दिवस संबंधित कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्याच्या नावाने राखीव राहील. या कालावधीत शेतकऱ्याने आपल्या सोयीनुसार कृषी सेवा केंद्रावर जाऊन क्यूआर कोड स्कॅन करून खताची उचल करायची आहे.अर्ज प्रक्रियेसंदर्भात किंवा खत वितरणाबाबत कोणतीही अडचण आल्यास संबंधित कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. प्राप्त तक्रारींची पडताळणी करून पात्र प्रकरणांवर कार्यवाही करण्यात येणार आहे..काय आहे प्रकल्प?या प्रकल्पात ॲग्रीस्टॅक आणि खत वितरणाच्या आयएफएमएस (IFMS) प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.खत वितरणासाठी शेतकऱ्यांसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हे मोबाइल ॲप विकसित करण्यात आले असून ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.या ॲपद्वारे शेतकरी अनुदानित खताची आगाऊ नोंदणी (बुकिंग) करू शकतात.त्यामुळे शेतकऱ्यांना रांगेत उभे राहून खत घेण्याची गरज भासणार नाही.खरेदी केलेल्या प्रत्येक अनुदानित खताच्या गोणीची नोंद प्रणालीमध्ये राहणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.