Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Water Crisis : टँकर घटले; काही भागांत टंचाई कायम

Tanker Water Supply : खानदेशात टँकरची संख्या मागील काही दिवसांत कमी झाली आहे. टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. परंतु काही भागात टँकर सुरू आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात टँकरची संख्या मागील काही दिवसांत कमी झाली आहे. टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. परंतु काही भागात टँकर सुरू आहेत. आजघडीला खानदेशात किंवा तिन्ही जिल्ह्यांत सुमारे ५२ टँकर सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्यात सुमारे २० आणि धुळे व नंदुरबारमध्ये मिळून ३२ टँकर सुरू आहेत. टँकरची संख्या यंदा जूनमध्येही वाढली. परंतु मागील पंधरवड्यात टँकरची संख्या कमी झाली आहे.

यात काही गावांत विहीर अधिग्रहणाची कार्यवाही केल्याने पाण्याची तातडीने व्यवस्था झाली. यंदाही खानदेशात सुमारे ८५ टँकर जूनच्या सुरुवातीपर्यंत सुरू होते. जळगाव जिल्ह्यात सुमारे ३२ पेक्षा अधिक टँकर होते. परंतु काही भागांत जलस्रोत उपलब्ध झाल्याने आणि टंचाईची तीव्रता कमी दिसताच टँकरची संख्या कमी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, अमळनेर भागात टँकर अधिक होते. सध्याही याच भागात टँकर अधिकचे सुरू आहेत. धुळ्यातही शिंदखेडा, साक्री भागात टँकर अधिक होते. नंदुरबारमध्ये नंदुरबार व नवापुरात टँकरची संख्या अधिक होती. या भागांतही टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. परंतु टँकरमुक्ती अजून झालेली नाही.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगावात आठ गावे टंचाईग्रस्त आहेत. अमळनेरात चार आणि जामनेरातही चार गावे टँचाईग्रस्त आहेत. पारोळा व भुसावळात प्रत्येकी दोन आणि भडगाव, पाचोरा तालुक्यांत प्रत्येकी एक गावात टंचाई कायम आहे.

विहीर अधिग्रहणाचा लाभ

खानदेशात जूनमध्येही काही भागात विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यामुळे टंचाई दूर होण्यास मदत झाली. १०० पेक्षा अधिक विहिरींचे अधिग्रहण खानदेशात जूनमध्ये करण्यात आले. जामनेरमध्ये सर्वाधिक ११ गावांत १२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यामुळे टँकरची संख्या कमी राहण्यास मदत झाली.

जोरदार पावसाची गरज

खानदेशात जूनमध्ये सरासरीएवढा पाऊस अनेक तालुके, महसूल मंडलांत झाला आहे. परंतु काही भागांत पाऊसमान कमी आहे. हलका ते मध्यम, तुरळक पाऊस झाला आहे. यामुळे पेरण्या झाल्या. पीकस्थिती बरी दिसते.

परंतु टंचाई १०० टक्के दूर होण्यास बळ मिळाले नाही. यामुळे जोरदार पावसाची गरज आहे. जळगावात फक्त गिरणा व हतनूर धरणातील साठा वाढला आहे. हतनूरमधून मध्यंतरी साठा नियंत्रणासाठी विसर्गही सुरू होता. प्रकल्प भरण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Fertilizer Stock : देशात खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा; शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागणार नाही, केंद्र सरकारचा दावा

Agriculture Exports: कृषी व्यापार धोरण आणि निर्यातीतील कामकाज

Sugarcane Crushing Season: सहा कारखान्यांचा हंगाम आटोपला

LPG Gas Cylinder Price Hike: युद्धाची सर्वसामान्यांना झळ, घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला

Nathacha Ranjan Ritual: ‘नाथांचा रांजण’ भरण्याच्या पारंपरिक सोहळ्याला प्रारंभ

SCROLL FOR NEXT