Tanker Water Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Scarcity : मराठवाड्यात पाणीटंचाई गंभीर ; टँकरची संख्या ४३५ वर

Water Crisis : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील २७८ गाव व ९९ वाड्यांमध्ये टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील २७८ गाव व ९९ वाड्यांमध्ये टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या गाववाड्यांमध्ये टंचाई निवारण्यासाठी प्रशासनाकडून ४३५ टँकरने पाणीपुरवठा करण्याची सोय केली गेली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालन्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत.

मराठवाड्यात पाणीटंचाई वाढत चालली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक १७७ गावे व ३१ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. ही टंचाई निवारण्यासाठी प्रशासनाकडून खासगी २५९ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील ७० गावे व १९ वाड्यांमध्ये पाणीटंचाई तीव्र असून त्यासाठी शासकीय ९ व १११ खासगी मिळून १२० टँकरने पाणीपुरवठाच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

परभणी जिल्ह्यातील एका गावात टंचाई जाणवत असून त्यासाठी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील २ वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून त्यासाठी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील ६ गावे व २१ वाड्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यासाठी १८ टँकरच्या साह्याने पाणी पुरवठ्याच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील १८ गावे व २३ वाड्यांना टंचाईची झळ बसत आहे.या टंचाईग्रस्त गाव वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी २६ टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील २ गावे व ३ वाड्यांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील ४ गावांना पाणीटंचाईची चटके सहन करावे लागत आहेत.त्यांची पाणीटंचाई निवारण्यासाठी ७ टँकरच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.\

जिल्हानिहाय अधिग्रहित विहिरींची संख्या

जिल्हा विहिरींची संख्या

छत्रपती संभाजीनगर १८५

जालना १४७

परभणी १९

हिंगोली ६८

नांदेड १६८

बीड ६५

लातूर ४४

धाराशिव ५९

साडेसातशेवर विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यात टँकर साठी व टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठा करता सुमारे ७५५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये २३९ विहिरींचे टँकरसाठी तर ५१६ विहिरींचे टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

iPhone Craze: आयफोन नावाचे स्टेट्स सिम्बॉल

Monsoon Diaries: पाऊस आपल्यासारखंच वागतोय...

Wheat Varieties: गव्हाचे तांबेरा आणि करपा रोगासाठी प्रतिकारक वाण

Biodiversity Conservation: विज्ञान, तंत्रज्ञानाच्या बळावर जैवविविधतेचे संवर्धन

Weekly Weather: बहुतांशी भागात मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT