Solapur News : लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने उजनी प्रकल्पासह मध्यम आणि लघु प्रकल्प आणि विविध नद्यांवरील बंधाऱ्यांतील पाण्याचा सिंचन व बिगरसिंचनासाठी वापर करणाऱ्या शेतकरी, शेतकरी पाणी वापर संस्था, औद्योगिक वसाहती व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मार्चअखेर ९५ कोटी ६६ लाख ७८ हजारांची पाणीपट्टी वसूल केली आहे. त्याची टक्केवारी उद्दिष्टाच्या ८७ टक्के इतके आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधीक्षक कार्यालयांतर्गत उजनी या जिल्ह्यातील मोठ्या, सात मध्यम, लघु पाटबंधारे प्रकल्पासह नद्यांवरील बंधाऱ्यांचे पाणी व्यवस्थापन केले जाते.
या प्रकल्पातील पाण्याचा शेतकरी सिंचनासाठी तर औद्योगिक वसाहती, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायती पिण्यासाठी म्हणजे बिगर सिंचनासाठी वापर करतात. या संस्थांकडून लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालय पाणीपट्टी वसूल करते.
राज्य सरकारने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणला २०२४ - २५ या आर्थिक वर्षासाठी एकूण ११० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. यात सिंचनाचे ९ कोटी ७४ लाख तर बिगर सिंचनाचे १०० कोटी २६ लाखांचे उद्दिष्ट होते. प्राधिकरणने मार्चअखेर ९५ कोटी ६६ लाखांची वसुली केली आहे. गतवर्षी ९२ कोटींची वसुली झाली होती. यंदा ३ कोटी अधिक वसुली झाली आहे.
पाणीपट्टीची आकडेवारी (कोटीत)
सिंचन उद्दिष्ट ९७४.००
बिगर सिंचन उद्दिष्ट १००२६.००
एकूण उद्दिष्ट ११०००.००
सिंचन वसुली ७७३.५६
बिगर सिंचन वसुली ८७९३.२२
एकूण वसुली ९५६६.७८
टक्केवारी ८७
मागील वर्षी ९२ कोटी वसुली झाली होती. पाऊस कमी झाल्याने अडचणी होत्या. मात्र, यंदा त्यापेक्षा जास्त म्हणजे ९५ कोटी वसुली झाली आहे. कर्मचाऱ्यांनी विशेषतः साखर कारखाने व शेतकऱ्यांकडील पाणीपट्टी वसुलीसाठी सतत पाठपुरावा केला. त्यामुळे यंदा पाणीपट्टी वसुलीत वाढ होऊ शकली.- सुबिरवेंद्र खांडेकर, प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.