Maharashtra Monsoon : सांगली जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत सरासरी आठ दिवस पावसाने हजेरी लावली असून, आतापर्यंत ५७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस ऑगस्टच्या सरासरीच्या ५१.६ टक्के आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून, आटपाडी आणि जत तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे..जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यांत सरासरी १११.४ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. त्यापैकी २१ दिवसांत सरासरी आठ दिवस पाऊस झाला. शिराळा तालुक्यात सर्वाधिक १९ दिवस पावसाची नोंद झाली असून, अन्य तालुक्यांत चार ते अकरा दिवस पाऊस झाला. शिराळा तालुक्यात १५७.८ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो तालुक्याच्या सरासरीच्या ७१.५ टक्के आहे. वाळवा तालुक्यात ६८.९, तासगाव ७७, पलूस ५५.८, कडेगाव ५५.४, कवठेमहांकाळ ४१.९ आणि खानापूर तालुक्यात ३९.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे..Dhule Rain Update: धुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०२ टक्के पाऊस.दुष्काळी जत तालुक्याचा ऑगस्टमधील सरासरी पाऊस ८५.४ मिलिमीटर आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १३.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आटपाडीचा सरासरी पाऊस ५५.७ मिलिमीटर असताना प्रत्यक्षात केवळ ६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी मंडलात ११ दिवसांत तब्बल २४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. शिराळा तालुक्यातील सर्वच मंडलांत सरासरीच्या ९८ ते ११० टक्क्यांपर्यंत पाऊस नोंदवला गेला आहे..Marathwada Heavy Rain: पावसाने मराठवाडा ‘चिंब’.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली असून, अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे बहुतांश भागातील खरीप पिकांना हा पाऊस काहीसा उपयुक्त ठरत आहे. मात्र, आटपाडी आणि जत तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..६४.१ मिलिमीटरने पावसाची घटगतवर्षी ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत जिल्ह्यात १२१.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. हा पाऊस सरासरीच्या १०९.२ टक्के होता. या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच मंडलांत सरासरीच्या ७० ते ३०० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला होता. यंदा मात्र ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५७.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ६४.१ मिलिमीटरने पावसाची घट झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.