Maharashtra Farmers : अकोला जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर आदी पिकांना पाण्याचा मोठा ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली..सध्या सोयाबीन पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी फुलगळ, शेंगांची संख्या कमी होणे आणि दाणे न भरण्याची शक्यता आहे. कापूस, तूर, मूग व उडीद पिकांवरही पावसाअभावी परिणाम होत आहे..El Nino Challenges: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतीसमोरील आव्हाने.शासनाने गावनिहाय तसेच शेतनिहाय प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेऊन प्रतिहेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी..Farm Irrigation: पावसाच्या दडीमुळे पिकांना तुषार सिंचनाचा आधार.पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याचा न्याय्य लाभ, कर्जमुक्तीचा दिलासा, तसेच जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेने केली..‘पिके हातातून गेल्यानंतर पंचनामे करण्यापेक्षा आजच बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी,’ असे गवळी यांनी म्हटले आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी संजय सोनोने, मंगेश गावंडे, पूर्णाजी खोडके, सुनील इंगळे, रमेश चिंचे, शंकर सनगाडे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.