Map Heat Weave and Rain
Map Heat Weave and Rain Agrowon
ॲग्रो विशेष

दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा

टीम ॲग्रोवन

पुणे : कमाल तापमानाचा (temperature) पारा ४१ अंशांपार गेल्याने अंगाची लाही लाही होत असतानाच, राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी पावसाने दणका दिला आहे. आज (ता. १२) राज्यात उन्हाचा चटका (Heat Weave) कायम राहणार असून, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा (stormy rain) इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उन्हाच्या झळा कायम आहे. अकोला येथे सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती, ब्रह्मपुरी वर्धा, वाशीम येथेही तापमान (temperature) ४२ अंशांवर होतो. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३२ ते ४१ अंशांच्या आसपास होते. उष्णतेची लाट ओसरली असून, उन्हाची ताप कायम राहणार आहे.उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तुरळक गारपीट (Hail) झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, शिरोळ येथे २० मिलिमीटर, हातकणंगले येथे १० मिलिमीटर, सांगलीतील पलूस येथे २० तर कसबे डिग्रज येथे १० मिलिमीटर आणि सोलापूरातील मोहोळ येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, धुळे ४१.०, कोल्हापूर ३४.२, महाबळेश्वर ३१.०, मालेगाव ४२.८, नाशिक ३७.१, निफाड ३६.१, सांगली ३६.१, सातारा ३७.९, सोलापूर ४०.२, सांताक्रूझ ३३.८, डहाणू ३५.१, रत्नागिरी ३२.७, औरंगाबाद ४१.०, नांदेड ४०.६, परभणी ४०.५, अकोला ४३.९, अमरावती ४२.६, बुलडाणा ४०.५, ब्रह्मपुरी ४२.१, गोंदिया ४१.२, नागपूर ४१.२, वर्धा ४२.२, वाशीम ४२.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT