Sindhudurg Rain News Agrowon
ॲग्रो विशेष

Rain News : कुकडी खोऱ्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा

Team Agrowon

Pune News : पास सव्वादोन महिने झाले आहे. या काळात जिल्ह्यातील कुकडी खोऱ्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे या खोऱ्यातील धरणे अजूनही भरली नसल्याने, जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. येत्या काळात जोरदार पाऊस झाल्यास पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, घोड ही धरणे भरतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

चालू वर्षी पुणे जिल्ह्यातील नीरा आणि मुठा खोऱ्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत ही धरणे जवळपास शंभर टक्के भरली आहेत. तर नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला आहे.

त्यामुळे पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडिवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर ही धरणे भरली आहेत. या भरलेल्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. परंतु कुकडी खोऱ्यातील धरण क्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस पडलेला नाही.

कुकडी धरण क्षेत्रात पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी आणि घोड या धरणांचा समावेश होतो. परंतु जून महिन्यात या धरण क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस झाला. तर जुलै महिन्यात काही प्रमाणात संततधार पाऊस पडल्याने धरणसाठ्यात काहीशी वाढ झाली आहे. एक जूनपासून ते आतापर्यंत याकाळात पिंपळगाव जोगे धरणक्षेत्रात ४४६ मिलिमीटर पाऊस पडला.

तर माणिकडोह ४९१, येडगाव ४२१, वडज ४५३, डिंभे ७९७, चिल्हेवाडी ४९९, घोड ३३१ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे या सर्व धरणांत एकूण पाण्याची उपलब्ध क्षमता ३५.३४ टीएमसीपैकी २४.४५ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. यामध्ये डिंभे धरणात ९२ टक्के, तर येडगाव धरणात ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

पिंपळगाव जोगे धरणात अवघा २४ टक्के, माणिकडोह ४९ टक्के, वडज ७० टक्के, चिल्हेवाडी ७७ टक्के, घोड ७८ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या पावसाचा जोर ओसरला असून पिंपळगाव, चिल्हेवाडी धरणक्षेत्रांत अवघा १२ मिलिमीटर पाऊस झाला. तर माणिकडोह येथे ९ मिलिमीटर पाऊस झाला. येडगाव, डिंभे, वडज, घोड धरणक्षेत्रात पावसाची उघडीप होती.

कुकडी धरणक्षेत्रातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

धरण एकूण क्षमता पाणीसाठा टक्केवारी गेल्या वर्षीचा पाणीसाठा टक्केवारी

पिंपळगाव जोगे ३.८९ ०९७ २४ १.६५ ४२

माणिकडोह १०.१७ ५.०१ ४९ ५.३२ ५२

येडगाव १.९४ १६७ ८६ १८८ ९६

वडज १.१७ ०.८२ ७० ०.८० ६८

डिंभे १२.४९ ११.५३ ९२ १०.३५ ८२

चिल्हेवाडी ०.८० ०.६३ ७७ ०.६२ ७७

घोड ४.८७ ३.८३ ७८ १.१८ २४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT