Kolhapur Sangli Flood agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Sangli Flood : धास्ती महापुराची! जागतिक बँकेच्या पथकाची आपत्ती व्यवस्थापन विभागाला अचानक भेट, अधिकाऱ्यांकडून सूचना

World Bank Squad : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरप्रवण क्षेत्राची पाहणी करण्यास जागतिक बँकेचे पथक तीन दिवस दौऱ्यावर आहे.

sandeep Shirguppe

Disaster Management Department Kolhapur : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरप्रवण क्षेत्राची पाहणी करण्यास जागतिक बँकेचे पथक तीन दिवस दौऱ्यावर आहे. यामध्ये महापालिका क्षेत्र आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर बाधीत होणाऱ्या क्षेत्राची पाहणी केली जात आहे. दरम्यान काल (ता.२५) रात्री अचानक पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट दिली. बारा महिने चोवीस तास कार्यरत असलेल्या कक्षाच्या कामकाजाने पथकातील प्रतिनिधी प्रभावित झाले. पथकातील प्रतिनिधी व आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ अनुप करनाथ यांनी कारवार येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची माहिती घ्यावी, असे सांगितले.

पथकाकडून दिवसभर महापालिका क्षेत्रातील पूरप्रणव क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर रात्री पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी माहिती दिली.

स्क्रिनवर डिजिटल मॅपची सुविधा देण्याची मागणी केली. जेणेकरून जिल्ह्यातील धरणे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, बंधारे, नदीची पाणी पातळी आदी पूरप्रवण घटकांची माहिती पटकन मिळू शकेल, यावर पथकातील सदस्यांनी सकारात्मक चर्चा केली.

पथकातील प्रतिनिधी जोलंटा क्रिस्पिन-वॅटसन, सत्यप्रिया, आभास झा, दीपक सिंग, संगीता पटेल, सविनय ग्रोवर, वरुण सिंग, नेहा व्यास, युकिओ टनाका, विजयशेखर कलवकोंडा, शीना अरोरा, टीजार्क गॉल, डॉ. अभिजित शहा, रुमीता चौधरी, ऋषिकेश कोलटकर, अतुल खुराना आदी उपस्थित होते.

महापूर नियंत्रणाचा अभ्यासपूर्वक आराखडा तयार करावा : क्षीरसागर

जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र रिझिलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हा प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. यासाठी २ हजार २४० कोटी अर्थसाहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे. एकूण तीन हजार २०० कोटींचा हा प्रकल्प असून, ९६० कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

हा आराखडा तयार होताना यामध्ये संबंधित असलेल्या सर्वच विभागांनी समन्वय ठेवून अभ्यासपूर्वक आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी संबंधित शासकीय विभागांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मित्रा संस्था, जागतिक बँक सदस्य आणि शासकीय यंत्रणांची समन्वय बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, सांगली महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT