Central Government Sugar agrowon
ॲग्रो विशेष

Central Government Sugar : 'केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाने शेतकऱ्यांवर व्याजाचा भूर्दंड'

Mansing Naik : केंद्र सरकारच्या एका चुकीच्या निर्णयाने विश्वास कारखान्याच्या सभासदांना १० कोटीचा भुर्दंड बसल्याची टीका आमदार नाईक यांनी केली.

sandeep Shirguppe

Shirala Sangli Politics : विश्वास कारखान्यातर्फे पहिल्या टप्प्यात रिळे व दुसऱ्या टप्प्यात चिखली येथे सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. अडचणीच्या काळात मदत म्हणून शेतकऱ्यांना उभ्या उसावर एकरी २० हजार रुपये कर्ज व सभासदांना ज्यादा साखर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

तसेच इथेनॉलसाठी कारखान्याने १०० कोटी गुंतवले असताना गेल्या वर्षी इथेनॉलवर सरकारने बंदी घातल्याने सभासदांच्या डोक्यावर १० कोटीच्या व्याजाचा भुर्दंड बसला. केंद्र सरकारच्या एका चुकीच्या निर्णयाने विश्वास कारखान्याच्या सभासदांना १० कोटीचा भुर्दंड बसल्याची टीकाही आमदार नाईक यांनी केली.

चिखली येथे विश्वासराव कारखान्याच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, रणधीर नाईक, विराज नाईक, माजी कार्यकारी संचालक बाबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

नाईक म्हणाले, यावर्षी आलेल्या पुरात नदी काठची पिके कुजली आहेत. पाऊस पडला तरी. आणि नाही पडला तरी शेतकऱ्याचे नुकसान होतेच. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. इथेनॉलसाठी कारखान्याने १०० कोटी गुंतवले असताना गेल्या वर्षी इथेनॉलवर सरकारने बंदी घातल्याने सभासदांच्या डोक्यावर १० कोटीच्या व्याजाचा भूर्दंड बसला आहे. केंद्र सरकारच्या एका चुकीच्या निर्णयाने विश्वास कारखान्याच्या सभासदांना १० कोटीचा भुर्दंड बसत असेल तर त्यावर टीका करायची नाही का?

मी टीका केल्याने सत्यजित देशमुख म्हणतात सरकार भाजपचे असून मी सरकारवर टीका करतोय. पण आम्हाला एनसीडीसीचे कर्ज चालतंय. मात्र त्यांना हे माहित असायला हवे की एनसीडीसीही भाजपची बँक नाही. पन्नास वर्षे सत्ता असताना काँग्रेसच्या कोणत्या ही नेत्याने कधी ही आपली बँक असल्याचा दावा केला नाही. या बँकेकडून विश्वास कारखाना प्रत्येकवर्षी कर्ज घेवून नियमित परतफेड करतोय. त्या ठिकाणी कारखान्याची''अ''श्रेणी आहे.

शिवाजीराव नाईक म्हणाले, गावापासून राज्यापर्यंत आपल्या विचारांचा व विकासासाठी झटणारा कणखर माणूस पाहिजे. विकास कामात शिराळा तालुका अग्रेसर आहेच. एकत्रित ताकद पणाला लावली तर विकास होऊन संघटित ताकदीने आपले प्रश्न सुटतील. कारखान्याचे अध्यक्ष म्हणून मानसिंगराव नाईक यांनी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. आमदार म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील इतर आमदारांच्या तुलनेत जास्त निधी आपल्या मतदारसंघात आणला आहे.

स्वागत संचालक विराज नाईक यांनी केले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी केले. रणजितसिंह नाईक,बापुसो नकील, शामराव पाटील, उमाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.नदी बुड क्षेत्रातील पिकांची शासनानाने नुकसान भरपाई द्यावी, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला.

यावेळी अमरसिंह नाईक, राजेंद्रसिंग नाईक, सम्राटसिंग नाईक, सुनीतादेवी नाईक, डॉ. शिमोनी नाईक, कार्यकारी संचालक अमोल पाटील, संचालक दिनकरराव पाटील, विश्वास कदम, सुहास पाटील, कोंडीबा चौगुले उपस्थित होते. आभार हंबीरराव पाटील यांनी मानले.

वडिलांची अस्मिता विकणाऱ्यांनी आमच्यावर बोलू नये

शिवाजीराव देशमुखांनी स्वतःच्या ताकदीने व हिमतीने उभारलेल्या निनाई कारखान्याचे दालमिया सोबत साटेलोटे करून स्वतःच्या वडिलांची अस्मिता विकणाऱ्यांना विश्वास कारखान्यावर बोलण्याचा अधिकार नाही. आधी संस्था चालवून फायद्यात आणा. मगच विश्वासची माफे काढा, अशी खरमरीत टीका आमदार मानसिंगराव नाईक यांनी सत्यजित देशमुख यांच्यावर केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT