Vishnupuri Dam  Agrowon
ॲग्रो विशेष

Vishnupuri Water Project : विष्णुपुरी प्रकल्प पुन्हा भरला शंभर टक्के

Unseasonal Rain : जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी मॉन्सूनोत्तर पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र असे असले तरी दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी मॉन्सूनोत्तर पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र असे असले तरी दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

विष्णुपुरी प्रकल्प पुन्हा एकदा शंभर टक्के भरला आहे. जिल्ह्यातील १०४ प्रकल्पात गेल्या आठवड्याच्या तुलनेत अवकाळी पावसामुळे २४ दशलक्षघनमीटर पाणीसाठा वाढला आहे. शहर आणि जिल्ह्याला ता. २६ ते ता. २९ नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाचा फटका बसला.

वादळी वाऱ्यासह कुठे गारपीट तर कुठे अतिवृष्टीही झाली. त्यामुळे तूर, ज्वारी, कापूस, ऊस, केळी, हळद, पपईसह इतर पिकांना फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र असे असले तरी दुसरीकडे पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढला.

तसेच जिल्ह्यातील प्रकल्पातही पाणीसाठा वाढला आहे. नांदेड पाटबंधारे मंडळाने साप्ताहिक पाणीपातळीचा अहवाल गुरूवारी (ता. ३०) दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १०४ प्रकल्पात ५१२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी ७०.३७ झाली आहे.

गेल्या आठवड्यात उपयुक्त पाणीसाठा ४८८.४३ दलघमी होता. त्यात अवकाळी पावसामुळे २४ दलघमीने वाढ झाली आहे. गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पात गेल्या आठवड्यात ५७.८० दलघमी म्हणजेच ७१.६५ टक्के पाणीसाठा होता. त्यात अवकाळी पावसानंतर आता शंभर टक्के म्हणजेच ८०.७९ दलघमी पाणीसाठा झाला आहे.

प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा व टक्केवारी

मानार प्रकल्प : ८४. ९२ : ६१.४४

विष्णुपुरी प्रकल्प : ८०.७९ : १००

मध्यम प्रकल्प (नऊ) : ७७.०९ : ५५.४३

उच्च पातळी बंधारे (नऊ) : ११७.३२ : ६१.८१

लघु प्रकल्प (८०) : १४७.८६ : ८५.५७

कोल्हापुरी बंधारे (चार) : ४.४० : ५९.१२

एकूण (१०४) : ५१२.३८ : ७०.३७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT