Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : ‘सरपंच साहेब निवडून आले, पाण्याचे आश्वासन विसरून गेले’

Protest For Water : उन्हाळा सुरू होताच माळपठारावरील पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होत आहे. नदी-नाले कोरडी पडली असून विहिरीसुद्धा खोल जात आहेत. माळपठारावरील सावरगाव गोरे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे.

Team Agrowon

Yavatmal News : माळपठारावरील सावरगाव गोरे येथील पिण्याचे पाणी पेटले असून पाणी देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरपंचाला महिला व गावकऱ्यांनी दोराने बांधून मोर्चाद्वारे एसडीओ कार्यालयात आणले.

‘सरपंच साहेब निवडून आले, पाण्याचे आश्वासन विसरून गेले’ अशा घोषणा देत आलेल्या मोर्चाने महसूल व पंचायत प्रशासन चक्रावून गेले. उन्हाळा सुरू होताच माळपठारावरील पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होत आहे. नदी-नाले कोरडी पडली असून विहिरीसुद्धा खोल जात आहेत.

माळपठारावरील सावरगाव गोरे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे सावरगावच्या सरपंचाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

सरपंचाच्या छातीवर फलक लावून, दोराने हात बांधून महिलांनी घागर मोर्चा काढत उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात महिला डोक्यावर रिकाम्या घागर घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला.

सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहताना मी सहा महिन्यांच्या आत नागरिकांना पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु जलजीवन मिशनचे काम रेंगाळल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष माझ्यावर आला आहे. एका लोकप्रतिनिधीची अशी दैना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाली आहे.
- प्रताप बोडखे, सरपंच, सावरगाव गोरे
सावरगाव गोरे येथे पाणीटंचाई आहे. जल जीवन मिशनचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवण्यात करण्यात येईल. २०२५ ची लोकसंख्या गृहीत धरून वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव एसडीओ कडे पाठविण्यात येईल.
- संजय राठोड, गटविकास अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Food: मत्स्यखाद्यासाठी ब्लॅक सोल्जर माशीच्या अळ्या

Agriculture Technology: यंत्रसामग्रीच्या व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

Orange Farmers: संत्रा बागांचे पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या

Agriculture Success Story: युवा शेतकऱ्याची बहुविध फळबाग तंत्र पध्दतीची शेती

Farmers Protest: आश्वासन पाळा, अन्यथा मंत्र्यांना अडवू

SCROLL FOR NEXT