Solar Project Electricity agrowon
ॲग्रो विशेष

Gayran Land : गायरानमधील जमीन न देण्यावर ग्रामस्थ ठाम

Agriculture Solar Scheme : दुंडगे (ता. चंदगड) येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गायरानमधील जमीन देण्याबाबत ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : दुंडगे (ता. चंदगड) येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गायरानमधील जमीन देण्याबाबत ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्याअनुषंगाने आज ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत बैठक घेतली; पण ग्रामस्थ आपल्या मतावर ठाम राहिले. त्यांनी जमीन देण्याला कडाडून विरोध दर्शवला. शासनाने जनभावनेचा आदर करून प्रकल्पाला जमीन देण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी बैठकीत केली.

नायब तहसीलदार हेमंत कामत, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अजित पवार, मंडल अधिकारी शरद मगदूम यांच्याबरोबर ग्रामस्थांची पोलिस बंदोबस्तात कार्यालयात बैठक झाली. नायब तहसीलदार कामत यांनी ग्रामस्थांनी सामोपचाराने निर्णय घ्यावा. अडचणी व प्रलंबित प्रश्नांबाबत शासन नक्कीच विचार करेल, असे सांगून वरिष्ठ कार्यालयाला भूमिका कळवण्याचे आश्वासन दिले.

पूरबाधित गाव असल्याने गायरान जमिनीचा गावाला एकमेव आधार असल्याचे ग्रामस्थांनी बैठकीत मत मांडले. प्रकल्पासाठी जमीन दिली तर भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा व गावकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जमीन देण्याला विरोध असल्याचे ग्रामस्थांनी मत मांडले. नायब तहसीलदार कामत यांनी शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी ही योजना शासनाने आणली आहे.

प्रकल्पामुळे भविष्यात विजेचे दर कमी होणार आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक विकासात्मक प्रकल्पाला विरोध करू नये, असे मत मांडले. सरपंच चंद्रकांत सनदी व उपसरपंच लक्ष्मण पाटील यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता शासनाने हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय कसा घेतला, असा प्रश्न उपस्थित करून गावकऱ्यांचा निर्णय हा शासनाना मान्य करावाच लागेल, असे सांगितले.

गावच्या पुनर्वसनाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गायरानमधील जमीन देण्याला विरोध असल्याचे मत दयानंद पाटील यांनी मांडले. राजू पाटील यांनी गावच्या अडचणी शासनाने समजून घ्याव्यात. गावाला गायरानची गरज आहे. लोकभावनेचा विचार करून हा निर्णय रद्द करावा, असे विचार मांडले. राजू पाटील, गजानन राजगोळकर, उत्कर्ष देसाई, आदी उपस्थित होते.

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

अधिकऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण ग्रामस्थांनी सौर प्रकल्पाला जमीन देण्याला विरोध दर्शवला. शासनाने ग्रामस्थांचा विरोध डावलून जमिनीवर ताबा घेतला, तर त्यासाठी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधू, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Forecast Maharashtra : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Chhattisgarh Urea Supply: छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; केंद्राने ६० हजार मेट्रिक टन यूरिया मंजूर केला

GST Reforms India : दुग्धजन्य पदार्थांवरील GST कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कसा फायदा होणार?

Semiconductor Chip : आली पहिली 'मेड इन इंडिया' चिप! शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Marathwada Flood: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; पंचनाम्यांना विलंब

SCROLL FOR NEXT