Agriculture Solar Scheme : शिरसगाव ग्रामस्थांनी बंद पाडले ‘मुख्यमंत्री सौरऊर्जा’चे काम

Solar Energy : शिरसगाव (ता. कडेगाव) येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ हा प्रकल्प सुमारे २२ एकर गायरानात उभारला जात आहे. या प्रकल्पाचे काम ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. १०) बंद पाडले.
Protest
Agriculture Solar Scheme Agrowon
Published on
Updated on

Sangli News : शिरसगाव (ता. कडेगाव) येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ हा प्रकल्प सुमारे २२ एकर गायरानात उभारला जात आहे. या प्रकल्पाचे काम ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. १०) बंद पाडले.

शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा व्हावा म्हणून राज्य शासनाच्या वतीने सर्वत्र सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. येथे हा प्रकल्प उभारण्याचे काम मागील महिनाभरापासून सुरू करण्यात आले आहे.

Protest
Solar Agriculture Scheme : सौर कृषी वाहिनीसाठी जमिनी अतिक्रमणमुक्त करा; मुख्यमंत्र्याकडून कोल्हापूर प्रशासनाला आवाहन

दरम्यान, ज्या ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू आहे, त्या ठिकाणची जुनी झाडे तोडण्यात आली. वन खात्याने ८०५ पैकी ४६६ झाडे तोडण्यास काही शर्तींवर परवानगी दिली होती. झाडे तोडल्यावर गावच्या हद्दीमध्ये पुन्हा वृक्षारोपण करण्यात यावे, असे या आदेशामध्ये नमूद करण्यात आले होते. परंतु, नवीन झाड लावण्यात आलेले नाही.

Protest
Solar Agriculture Scheme : सौर कृषी पंप योजनेपासून अल्पभुधारक शेतकरी वंचित; शेतजमीन अट ठरतेय जाचक

शिरसगाव हद्दीत गायरान क्षेत्र २५ एकर आहे. यातील १ एकर जागा २०१३ मध्ये वीजवितरण केंद्राला देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारल्यावर गावासाठी गायरान उरणार नाही, त्यामुळे हा प्रकल्प नको, असा ठराव शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला आहे. परंतु, त्यास न जुमानता प्रकल्पाचे काम दिवसभर सुरूच होते. शासनाने आमच्यावर कितीही दडपण आणले, तरी आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शिरसगाव येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची ग्रामसभेत मागणी

सौर ऊर्जाप्रकल्पासाठी शिरसगाव येथील गायरान जमीन हस्तांतरण करण्याबाबत प्रशासनातील अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचेही उल्लंघन केले आहे. या सर्व घटनाक्रमाशी संबधीत दोषी अधिकाऱ्यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशा मागणीचा ठराव शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com