सोमनाथ घोळवे
Rural Story : वडील सांगतात, दसऱ्याला गारवा (थंडी) गावाच्या वेशीवर येते, तर दिवाळीला गावात शिरत असते. अर्थात पावसाला हंगाम संपून, हिवाळा हंगामाची सुरुवात होते. त्यात एका हंगामाला निरोप आणि दुसऱ्याचे स्वागत करणे अशा जोडावर हा दसरा उत्सव आहे.
‘आई राजा उदे-उदे, सदा नंदीचा उदे-उदे’, ‘तुळजा भवानी माता की जय’, याच बरोबर स्थानिक देव-देवताची नावे घेऊन “आराध्याची गाणी” ग्रामीण भागात म्हणली जातात. ही गाणी दररोज एकाच्या घरी, असे वेगवेगळ्या घरी कार्यक्रम होत असतो. या गाण्यामध्ये मातीचा गंध लागलेला आहे.
तसेच गाण्यासाठी गावातील सर्व नागरिक एक होऊन ही गाणी टाळ आणि मुर्धुंग, झाहाज, नाली अशा वाड्याच्या तालावर गाईली जात आहेत. यातील सर्वात फेमस गीत म्हणजे “गार डोंगराची हवा न आईला सोसना गारवा” होय. हे गीत ऋतूचक्र बदलावर आधारित आहे. तसेच निसर्गाचे वर्णन करणारे, कृषी संस्कृतीचे दर्शन घडवणारे आहे.
आराध्यच्या गाण्यामध्ये ग्रामीण संस्कृतीचे प्रेमभाव उतरलेला आहे, मातीचा, बदलत्या ऋतू चक्राचा गंध आहे. या ही गाणी जगण्याची आणि कृषी संस्कृती सार असणारी असतात. या गाण्यातून भक्तीभाव, श्रद्धा आणि मनोरंजन याचा संगम अशी असणारी गाणी आहेत. विशेषतः ही गाणी महिला आणि पुरुष एकत्र येऊन गाईली जातात. दोन्हीमध्ये भेदभाव नसतो. एकजण पुढे म्हणतो, बाकीचे मागे म्हणतात, यात खंडोबा, तुळजाभवानी, येडाई, लक्ष्मीआई तसेच स्थानिक देवतांची राणोबा, म्हसोबा, भैरवनाथ दैवतांची गाणी असतात. ही दैवत बहुजनवाडी आहेत, श्रीमंत किंवा अभिजन नाहीत. या दैवतांवर श्रद्धा ठेवण्याचा अधिकार हा सर्वाना आहे. तसेच ही दैवत बहुजनांची कुलदैवत आहेत.
दसऱ्याच्या निमित्ताने ९ दिवस ही गाणी दररोज होतात. एकीकडे शेतीतील कामे खरीप हंगाम काढणीला आलेला, त्यात दुसरीकडे रब्बी हंगामातील पेरणी चालू आहे. अशा कामाच्या दिवसांमध्ये देखील संध्याकाळचा वेळ आराध्याच्या गाणी म्हण्यात घालवला जातो. हा एक ग्रामीण संस्कृतीचा ठेवा आहे. मात्र हा ठेवा हळूहळू कमी होऊ लागला आहे. याची जागा आधुनिक कृत्रिम मनोरंजनाने घेतली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.