Manoj Jarange Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation News : आरक्षण मिळतेपर्यंत राज्यात पुढाऱ्यांना गावबंदी

Manoj Jarange Patil Speech : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वच पक्षांच्या नेत्यांना आणि कायद्याच्या पदावर बसलेल्या सर्वांना बुधवार (ता. २५) पासून राज्यातील सर्वच गावांत गावबंदी करण्यात येणार आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Manoj Jarange Latest News : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वच पक्षांच्या नेत्यांना आणि कायद्याच्या पदावर बसलेल्या सर्वांना बुधवार (ता. २५) पासून राज्यातील सर्वच गावांत गावबंदी करण्यात येणार आहे.

तसेच बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात येईल, असे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (ता. २२) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.

श्री. जरांगे पाटील म्हणाले की, शासनाने जी मुदत घेतली होती ती २४ ऑक्टोबरला संपत आहे. मुदत संपत आली तरी शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. तसेच अद्याप संपर्क केला नाही.

मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. बुधवारपासून होणारे आंदोलन शासनाला झेपणार आणि पेलणार नाही. आरक्षणाचा अध्यादेश आला नाही तर अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल.

या उपोषणामध्ये वैद्यकीय उपचार, अन्न पाणी घेणार नाही. तसेच नेत्यांनी गावात यायचे असेल तर आरक्षणाचा अध्यादेश घेऊनच गावात यावे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद सर्कलमध्ये नागरिक एकत्र येऊन साखळी उपोषण सुरू करतील. २८ तारखेपासून साखळी उपोषण हे बेमुदत उपोषणात परिवर्तित होईल.

प्रत्येक तालुक्यातील गावात सरकारला जागे करण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात येईल. हे बेमुदत व साखळी उपोषण महाराष्ट्रातील जनता ठिकठिकाणी करणार आहे. २८ ऑक्टोबरला आंदोलनाबाबत जी दिशा सांगितली जाईल ते सरकारला झेपणार नाही नाही, याची दखल घ्यावी.

तसेच राज्यात जे उग्र आंदोलन होत आहे त्यांना आमचा पाठिंबा नाही. शांततेत आंदोलन करावे, आरक्षण मिळवून देणार आहे. आत्महत्या करू नका समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा, असेही ते म्हणाले.

जरांगे पुढे म्हणाले की, आमचेच लोक आमच्या विरोधात उभे केले. हा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही. शासनाला एक तासही वेळ वाढवून मिळणार नाही. सन १९६७, १९९० ला आरक्षण दिले, आता आरक्षण देण्यासाठी वेळ का लागतो? आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्यांचे नाव २५ रोजी जाहीर करू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना आरक्षण देण्यासाठी सांगितले पाहिजे. अद्याप सरकारकडून निरोप आला नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. आता शासनाने बळाचा वापर करू नये व लवकरच टिकणारे आरक्षण जाहीर करावे, असे श्री. जरांगे म्हणाले.

जरांगे पाटील काय म्हणाले...

- प्रत्येक गावात कॅन्डल मोर्चा काढून शासनाला जागे करणार.

- प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये आंदोलन करणार.

- अंतरवाली सराटी येथे बुधवार(ता. २५)पासून बेमुदत उपोषण.

- २८ तारखेपासून साखळी उपोषण हे बेमुदत उपोषणात परिवर्तित होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT