Nanded News : जिल्ह्यातील मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी बुधवारी (ता. १८) न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सदस्यांनी नांदेडला भेट दिली. यावेळी जिल्ह्यातील मराठा समाजातील नागरिकांनी पुरावे, दस्ताऐवज सादर केल
जिल्हा नियोजन सभागृहाच्या कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, विधी व न्याय विभागाचे सहसचिव सुभाष कऱ्हाळे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी के. कार्तिकेयन, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपसचिव विजय पोवार, अभिजित पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, उपआयुक्त जगदीश मणियार, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, कक्ष अधिकारी डॉ. शेखर मगर आदी उपस्थित होते.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रत्येक विभाग प्रमुखांनी कार्यालयीन दस्तऐवजांचा अधिकाधिक तपास करून १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांवर जिथे कुठे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व या आनुषंगिक नोंदी असतील त्या शोधून काढाव्यात. जी पुरावे मिळत आहेत ती कार्यालयीन पातळीवर इतरांनाही तत्काळ निदर्शनास आणून द्या, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा समितीचे सदस्य सचिव मधुकरराजे अर्दड यांनी विभाग प्रमुखांना दिले.
आपला भाग पूर्वी निजामकालीन असल्याने हैदराबाद जनगणना, निजामकालीन अभिलेखे हे उर्दू शिक्षकांकडून, जाणकार व्यक्तींकडून समजून घेण्यावरही भर देण्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या काळातील रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन, सैनिक कल्याण, जुन्या जिल्हा परिषदेच्या मल्टीर्पपज स्कूल येथील अधिकाधिक कागदपत्रे गोळा करण्याचे त्यांनी सांगितले.
सुमारे ६४ व्यक्तींनी कागदपत्रे व पुरावे केले सादर
नागरिकांना समितीपुढे आपल्या जवळील निर्देशित केलेले पुरावे सादर करता यावेत यादृष्टीने दुपारी २ ते ४ हा वेळ समिती अध्यक्षांनी राखीव ठेवला होता. या वेळेत त्यांनी भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांनी सादर केलेली कागदपत्रे समजावून घेतली. विविध संघटना, प्रतिनिधी यांनी समितीपुढे कागदपत्रे व पुरावे सादर करून सकारात्मक विचार व्हावा अशी समितीला विनंती केली. यावेळी सुमारे ६४ व्यक्तींनी आपल्या जवळील पुरावे समितीला सादर केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.