Vijay Wadettiwar Agrowon
ॲग्रो विशेष

Vijay Wadettiwar : संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिएकरी २५ हजार रुपये द्या ; विजय वड्डेटीवर यांची मागणी

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति एकरी २५ हजार रुपये देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली

Swapnil Shinde

Unseasonal Rains Damage : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थिती तर दुसरीकडे अवकाळीच्या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढायचा असेल तर सरकारने प्रतिएकरी २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली.

विजय वड्डेटीवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्ला चढवला. राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. नुकतेच अवकाळी पावसाने मोठे संकट उभे केले आहे. या भीषण परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना आवश्यक मदत करणे अपेक्षित आहे. परंतु सरकार या परिस्थितीकडे दुर्लक्ष करताना दिसते. पण, केवळ घोषणा देऊन लोकांना मुर्ख बनवण्याचं काम असल्याचा आरोप वड्डेटीवार यांनी केला.

वड्डेटीवार म्हणाले, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने मदत दिली पाहिजे. शेतकरी रडत असताना तिजोरीकडे बोट दाखवून हात वर करून नये. तातडीने पंचनामे करून अधिवेशनाची वाट न पाहता नुकसान भरपाई आणि दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : देशात सोयाबीनचे दर वाढण्याचे संकेत

Maharashtra Rains : राज्यातील काही भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर; २४ तासांत १० जणांचा मृत्यू, जाणून घ्या कुठे कुठे पाऊस?

Bhima River Crisis : भीमेचे अश्रू

Palm Cultivation : बांबूसोबत पाम लागवडीचा पर्याय विचाराधीन

Farmer Flood Relief : सरकारने वेळकाढूपणा करू नये

SCROLL FOR NEXT