Palakhi Sohala  Agrowon
ॲग्रो विशेष

Palakhi Sohala 2024 : आळंदीच्या मानकरी बैलांची पशुवैद्यकीय तपासणी

Ashadhi Wari 2024 : श्री क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी रथासाठी बैलजोडी जुंपण्याचा मान या वर्षी आळंदी येथील सहादू कुऱ्हाडे यांच्या कुटुंबास मिळाला आहे.

Team Agrowon

Pune News : श्री क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी रथासाठी बैलजोडी जुंपण्याचा मान या वर्षी आळंदी येथील सहादू कुऱ्हाडे यांच्या कुटुंबास मिळाला आहे.

आळंदी येथे शुक्रवारी (ता. २१) पुणे जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी भेट देऊन बैलांची आरोग्य तपासणी केली.

रथांचे बैल तंदुरुस्त असून पालखी मार्गामध्ये पशुधनाची कोणकोणती काळजी घ्यायची. याबद्दल पशुपालकास माहिती देण्यात आली. बैलांना सर्व प्रकारच्या रोगप्रतिबंधक लसीकरण झाल्याची खात्री करण्यात आली.

विशेष बाब म्हणून मानाचा बैल असल्याने पालखी सोहळ्यादरम्यान नैवेद्य देण्याचा प्रघात असतो. तो टाळावा किंवा त्रास झाल्यास कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, याबद्दल माहिती देण्यात आली.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गर्जे हे पालखी मार्गावर लक्ष ठेवणार आहेत. संपूर्ण पालखी मार्गामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांचे पथक उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. तपासणी दरम्यान स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश शेळके व डॉ. दीपक औताडे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Project: विदर्भ व तापी खोऱ्यातील सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करा; गिरीश महाजनांचे आदेश

Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित

Jal Jeevan Mission : जलजीवनच्या पाणीपुरवठा योजना रखडल्या

Famer Relief Fund: पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदतीचे पैसे थेट खात्यात मिळणार; पॅकेजबाबत अजित पवारांची ग्वाही

ZP Reservation : जिल्हा परिषद आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT