Vegetables Rate agrowon
ॲग्रो विशेष

Vegetables Rate : भाजीपाला आवक घटली, टोमॅटो, मिरची, मेथी उत्पादक शेतकऱ्यांची सुगी, सुकामेवाही तेजीत

sandeep Shirguppe

Market Committee Rate : सध्या बाजारात भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने दरात काहीशी वाढ होताना पहायला मिळत आहे. भाजीपाल्यांचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळत आहे. फळभाज्यांचे दर किलोमागे दहा ते १५ रुपयांनी वाढले आहेत. टोमॅटो तर किलोमागे दहा रुपयांनी महागला असून, ५० ते ६० रुपये किलो असा दर झाला आहे.

वांगी ६० ते ८० रुपये किलो असा दर वाढला आहे. त्यामुळे आज रविवारच्या आठवडा बाजारात ग्राहकांचा अल्प प्रतिसाद लाभला. भेंडी, दोडका, फ्लॉवर, कोबीचे दर दहा रुपयांनी वाढले आहेत.

टोमॅटो, वांगी, ढबू, ओली मिरची यांची आवक घटली आहे. मागच्या आठवड्यात टोमॅटोचा दर ३० ते ४० रुपये प्रतिकिलो असा होता. आता हाच दर ५० ते ६० रुपयांवर पोहोचला आहे. मिरचीचे दर गेल्या आठवड्यापासून ८० ते ११० रुपये प्रतिकिलो असेच स्थिर राहिले आहेत. मेथी आणि कोथिंबीरचे दर अनुक्रमे ५० ते ७० रुपये पेंडी, तर मेथीचा दर २५ ते ३० रुपये पेंडी आहे.

फळभाजीचे दर एका किलोचे

कोबी १५ ते २०, वांगी ६० ते ८०, ढबू मिरची ४० ते ६०,गवार ६०, दोडका ६० ते ८०, भेंडी ३० ते ५०, पांढरी काकडी ३०, बिनीस ८० ते १४०, हिरवा टोमॅटो ३० ते ४०, गाजर ३०, पडवळ ४०, फ्लॉवर १५ गड्डा, शेवगा १० रु. तीन नग.

(ॲग्रो विशेष)

पालेभाज्यांचे दर पेंडी

मेथी ३०, पोकळा १५, तांदळी १० ते १५, पालक २०,

फळांचे दर किलोत

सफरचंद २०० ते ४०० रु. किलो, केळी (साधी) ३० ते ५० रु. डझन, केळी (जवारी) ४० ते ८० रु. डझन, ड्रॅगन फ्रुट १२० ते १५० रु. किलो, चिक्कू ६० ते ८०, कलिंगड ६० ते ८०, अननस ३० ते ४०, डाळिंब १०० तो १२०, तोतापुरी २५ ते ३०.

तेलाचे दर किलोचे

सरकी ११६ किलो, शेंगतेल २०३, सोयाबीन ११२, सूर्यफूल तेल १२४, खोबरेल तेल २८०.

बकरी ईदमुळे सुकामेव्याला मागणी

बकरी ईदमुळे सुकामेव्याला मागणी वाढली आहे. विशेषतः काजू तुकडा, पाकळी, बदाम, मनुका, आदी सुकामेव्याला मागणी आहे. यासह भाजकी शेवया, नियमित शेवयांना मागणी अधिक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटो दर?

Khapali Wheat : खपली गहू लागवडीला हवे प्रोत्साहन

Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

Farmers Welfare : शेतकरी कल्याणाचा वसा

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT