Vegetables Rate agrowon
ॲग्रो विशेष

Vegetables Rate : भाजीपाला स्वस्त, टोमॅटो, गवारीला चांगला भाव, कोंथिबीर उत्पादक शेतकरी हवालदिल

Tomato Gawari Rate Hike : गवारी, टोमॅटोच्या दरात वाढ झाली. मेथी, पोकळा, शेपू, कांदापात, पालक आदी भाज्या दहा रुपये प्रती पेंडी अशा झाल्या आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Vegetables Market : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान जिल्ह्यातील भाजीपाला बाजारात पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. गवारी, टोमॅटोच्या दरात वाढ झाली. मेथी, पोकळा, शेपू, कांदापात, पालक आदी भाज्या दहा रुपये प्रती पेंडी अशा झाल्या आहेत. मात्र, दोडका, वांगी, भेंडीचे दर वाढले असून कांदा, बटाट्याचे दर अनुक्रमे पस्तीस, चाळीस असे कायम राहिले आहेत.

कोथिंबीर पाच रुपये पेंडी, तर टोमॅटोचे दर चाळीस ते साठ रुपये किलो, गवारी सलग दोन महिन्यांच्या कालावधीत १०० ते १२० प्रति किलोचा दर टिकवून असल्याने गवारी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.

पालेभाज्यांचे दर (रुपयांत-प्रति पेंडी)

मेथी १०, पालक १०, कोथिंबीर ५,कांदापात १०, शेपू १०, मिश्र भाजी १० रु. पुदीना १०, पोकळा ५, लालमाठ १०, तांदळी १०, अंबाडा ५.

फळभाज्यांचे दर (रुपयांत -प्रति किलो)

वांगी ६० ते ८०, दोडका ६० ते ८०, टोमॅटो ५० ते ६०, ढब्बू मिरची ६०, भेंडी ६०, वरणा १००, गवार १०० ते १४०, आले १२०, ओली मिरची ८० ते १००, पडवळ २० ते ३० रु. नग, फ्लॉवर २० ते ५० रु. कोबी २० ते ४० रु नग, शेवगा १० रु (तीन नग), कणीस (स्वीट कॉर्न) १० ते १५ रु नग, साधे कणीस ६ रु. नग, कारले ४० ते ६०, तोंदली ८०, लिंबू- १० रु. ८ नग, भावनगरी मिरची ६० ते ८०

खाद्यतेल दर (रुपयांत -प्रति किलो)

सरकी तेल ११६, सोयाबीन तेल ११२, पामतेल ११२, शेंगतेल २०४, सूर्यफूल तेल १२०, खोबरेल तेल- २४०

फळांचे दर (रुपयांत -प्रति किलो)

सफरचंद १४० ते ३६०, पेरू १००, ड्रॅगन फ्रुट १२० ते १५०, डाळिंब ८० ते १२०, केळी प्रति डझन ३० ते ६० रु., जवारी केळी प्रति डझन ४० ते ८० रु. चिक्कू प्रति डझन ६० ते ८० रु.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT