Cultivation of flowers Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Farming : डहाणूत फुलतोय भाजीपाला, फुलांचा मळा

Floriculture : पालघर जिल्ह्यातील भागातील अनेक शेतकरी भातशेतीबरोबरच इतर भाजीपाला, फुलांची लागवड करू लागले आहेत.

Team Agrowon

Palghar News : लांबलेल्या पावसाने पावसाळी शेतीचे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे सध्या डहाणू भागातील अनेक शेतकरी भातशेतीबरोबरच इतर भाजीपाला, फुलांची लागवड करू लागले आहेत.

भात काढणीनंतर मिरची, कलिंगड, पालेभाजी, फळभाजीसह फुलांची लागवड करून रोजगार मिळवला जात आहे. खते, बी-बियाणे, शेतमजुरांचे वाढते दर यामुळे भातशेती तोट्यात जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

कासा, वाघाडी, धरमपूर, सोनाळे परिसरातील अनेक शेतकरी भाताच्या शेतीव्यतिरिक्त पालेभाजी, कारली, मिरची, तूर, दुधी, कलिंगड, मोगरा, झेंडूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. बोअरवेल, कालव्याचे तसेच नदी-नाल्याचे पाणी वापरून भाजीपाला लागवड केली जाते. यामध्ये कारली लागवड करण्यावर जास्त भर दिला जात आहे.

पावसाच्या लहरीपणामुळे भातशेतीचे मोठे नुकसान होते. त्यामुळे आता विविध भाजीपाल्याची लागवड करत आहे. पावसाळ्यात अतिपावसाने चवळीचा मांडव पडून नुकसान झाले. त्यामुळे आता मिरचीची लागवड केली आहे. बी-बियाणे, खते व मजुरी यावर खूप खर्च होत आहे. भातपीक घेणे जवळपास कमी केले आहे.
लाडक्या मातेरा, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT