FSSAI Rating  Agrowon
ॲग्रो विशेष

FSSAI Rating : ‘वनामकृवि’ला ‘ईट राईट कॅम्पस’चा ५-स्टार सन्मान

VNMKV Parbhani : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) कडून ‘ईट राईट कॅम्पस’ उपक्रमाअंतर्गत ५-स्टार रेटिंगसह सन्मानित करण्यात आले.

माणिक रासवे

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) कडून ‘ईट राईट कॅम्पस’ उपक्रमाअंतर्गत ५-स्टार रेटिंगसह सन्मानित करण्यात आले.

सहायक आयुक्त (अन्न) अनंतकुमार चौधरी यांनी गुरुवारी (ता. १२) कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्याकडे सन्मान प्रमाणपत्र सुपूर्द केले. या वेळी शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम आदी उपस्थित होते.

अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे, अरुण तम्मलवाड, राजश्री सावंत यांनी या प्रक्रियेत मार्गदर्शन करून विशेष भूमिका बजावली.

अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचा ‘ईट राईट कॅम्पस’ हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यस्थळे, रुग्णालये या ठिकाणी सुरक्षित, पौष्टिक, पर्यावरणपूरक खाद्य पद्धतींचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तो राबवण्यात येतो.

या अंतर्गत कॅम्पस परिसरात स्वच्छ, दर्जेदार व सुरक्षित अन्न पुरवठ्याची हमी, संतुलित, पोषक आहाराची सवय वृद्धिंगत करणे तसेच पर्यावरणपूरक खाद्य व्यवस्थापन व प्रक्रिया अंगीकारणे उद्दिष्टे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; राज्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा 

Wildlife Damage: चंदगडात वन्य प्राणी नुकसानप्रश्नी तहसीलवर मोर्चा

Paludarium Dapoli: जैवविविधता जतनासाठी दापोलीत ‘पालुडेरियम’

El Nino Impact : कमी पावसाचा अंदाज आणि पश्चिम आशियातील तणावामुळे शेती क्षेत्राला फटका बसेल; आयसीएआरचा इशारा

Parliament Special Session: विधिमंडळात महिलांना ३३ टक्के आरक्षण, लोकसभेच्या जागा ८५० करण्याचा प्रस्ताव, ३ महत्त्वाची विधेयके सादर

SCROLL FOR NEXT