Banana Food Processing Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Processing : केळीपासून मूल्यवर्धित उत्पादने

Banana Foods : केळी हे उत्तम शक्तिवर्धक, पचनास हलके व औषधी गुणधर्मयुक्त फळ आहे. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.

Team Agrowon

विवेकानंद तिमेवार

Banana Nutritional Benefits : केळी हे उत्तम शक्तिवर्धक, पचनास हलके व औषधी गुणधर्मयुक्त फळ आहे. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. केळीची पाने, खोड देखील अत्यंत फायदेशीर आहे. केळीच्या खोडापासून धागा निर्मिती आणि खत तयार करता येते.

प्युरी

प्युरीसाठी व्यवस्थितरीत्या पिकलेली केळी घ्यावीत. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. मंद आचेवर गरम पाण्यामध्ये १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावीत. त्यामुळे केळी मऊ होतात. गरम केळी थंड होण्यास ठेवून द्यावीत.नंतर त्यावरील साल काढून घ्यावी.

केळी ग्राइंडरमधून फिरवून घ्यावीत. तयार झालेली प्युरी फ्रीजमध्ये साठवून ठेवता येते.या प्युरीचा वापर लहान मुलांच्या आहारात केला जातो.

भुकटी

पूर्ण पिकलेल्या केळीच्या गराला दळून स्प्रे ड्रायर (३२ अंश सेल्सिअस) किंवा ड्रम ड्रायरमध्ये (९४ अंश सेल्सिअस) सुकवून पुन्हा ते कॅबिनेट ड्रायरमध्ये २ टक्क्यांपर्यंत पाण्याचा अंश राहील या पद्धतीने सुकवून भुकटी तयार केली जाते.

धाग्यापासून दोरी, क्राफ्ट पेपर, दोरखंड, पिशवी, पुठ्ठा, टिशू पेपर, शोभेच्या वस्तू, नोटांसाठी कागद, फाइलसाठी जाड कागद, पायपोस, फिल्टर पेपर आदीची निर्मिती करता येते.

खोडाच्या आतील गाभ्याचा उपयोग भाजी बनवण्यासाठी करतात.खोडाच्या पाण्याचा उपयोग रंगनिर्मितीसाठी केला जातो.

खोडापासून धागानिर्मिती

केळी घड काढल्यानंतर खोडापासून दांडा, पाने वेगळी केली जातात. खोडापासून धागा काढणारे यंत्र उपलब्ध आहे. या यंत्राच्या माध्यमातून दिवसाला ८ ते १० किलो धागा निघतो. कालांतराने पुढे १५ ते २० किलोपर्यंत धागा निघतो.

धागा काढताना खोडावरील वाळलेला भाग वेगळा काढावा लागतो.त्यानंतर खोडाची लांबी लक्षात घेऊन त्याचे २ ते ३ भाग करावेत. खोडाच्या एक मीटर पट्ट्या सुट्ट्या कराव्यात. या पट्ट्या यंत्रामध्ये टाकून त्यापासून धागा तयार केला जातो. या धाग्यामध्ये दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता असते.

खोडापासून खत निर्मिती

खोडापासून धागा काढल्यानंतर उर्वरित भाग हा शेण, मातीमध्ये मिसळून त्यापासून कंपोस्ट खत तयार करता येते.

खोडांचा वापर करून वाफा तयार करून त्यात शेणखत, मातीचे मिश्रण टाकले जाते. त्यापासून ८ ते १० महिन्यात खत तयार होते.

- विवेकानंद तिमेवार, ७५०७१५०१३८

(अन्नतंत्र महाविद्यालय,आष्टी,जि.बीड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Insurance Compensation: सोयाबीन विम्याचे ११४६ कोटी मंजूर

Sugar Production Rises: साखर उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ

Maha Annapurna Project: भात शेतीच्या कायापालटासाठी ‘महाअन्नपूर्णा प्रकल्प’

Drip Vendor Registration Issues: ठिबक विक्रेता नोंदणी रखडली

Vidarbha Heatwave: विदर्भात उष्ण लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT