Pre-Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain: वैभववाडी, कणकवलीला पावसाने झोडपले

Kokan Rain Update: विजांच्या कडकडाटांसह सोमवारी (ता. १२) सायकांळी वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांच्या अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: विजांच्या कडकडाटांसह सोमवारी (ता. १२) सायकांळी वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांच्या अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे या वर्षी प्रथम शेतमळ्यांमध्ये पाणी साचले होते. या पावसामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा पीक धोक्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी दोन-तीन वाजल्यापासून वैभववाडी तालुक्यातील डोंगरपायथ्याच्या गावांमध्ये विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली.

वैभववाडी तालुक्यातील करूळ, नावळे, सडुरे शिराळे, कुर्ली, घोणसरी, भुईबावडा, फोंडा, लोरे, खांबाळे, आर्चिणे, कनेडी, नाटळ, हरकुळ या गावांना मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अनेक भागांत तासभर मुसळधार पाऊस झाला.

त्यामुळे शेतमळ्यांमध्ये प्रथमच पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही नाल्यांमधून देखील पावसाचे वाहत होते. कोंडये, डामरे, नवीन कुर्ली वसाहत या भागांत हलक्या सरी झाल्या. जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांत देखील पावसाचे वातावरण होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baliraja Shet Raste Scheme : बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजनेसाठी विशेष मोहीम; शेत व पाणंद रस्त्यांचे तंटे संपणार?

Natural Disaster Relief: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा

Potato Varieties : शेतकऱ्यांसाठी फायद्याची गोष्ट! जास्त उत्पन्न देणारे बटाट्याचे ४ नवीन वाण, जाणून घ्या पीक कालावधी

Ocean Research: समुद्रतळाखाली गोड्या पाण्याचा साठा सापडला

Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT