Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : घोड धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात

Ghod Dam Water Level : धरणाची पाणी साठवण्याची क्षमता सात हजार ६३९ दशलक्ष घनफूट एवढी आहे. धरणातील पाण्यावर श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यांतील सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

Team Agrowon

Pune News : श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्राला लाभदायक ठरणाऱ्या तसेच दोन्ही तालुक्यांतील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला आहे.

त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांत पाऊस पडला नाही तर अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांना लवकरच झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे रांजणगाव गणपती पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यात आत्तापासूनच कपात करावी अशी मागणी लाभक्षेत्रातील गावामधून होत आहे.

धरणाची पाणी साठवण्याची क्षमता सात हजार ६३९ दशलक्ष घनफूट एवढी आहे. धरणातील पाण्यावर श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यांतील सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्याचबरोबर रांजणगाव गणपती येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत, रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला यामधून पाणीपुरवठा होतो.

याबरोबरच शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती, न्हावरे, ढोकसांगवी, तरडोबाचीवाडी, गोलेगाव, करडे, निमोणे, शिंदोडी तसेच श्रीगोंदा तालुक्यांतील हिंगणी, म्हसे, वडगाव शिंदोडी, काष्टी, श्रीगोंदा शहर आदी गावांतील नागरिकांना या धरणाच्या जलाशयातून पाणी पुरवले जाते. गत वर्षी धरणक्षेत्रात पर्जन्यमान कमी झाले होते त्यामुळे जलाशयात ऑगस्ट महिन्यात पन्नास टक्केही पाणी आले नव्हते.

मात्र त्यानंतर कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणात मुबलक पाणीसाठा झाल्यानंतर त्यामधील अतिरिक्त झालेले पाणी घोड धरणात सोडल्यानंतर जलाशय शंभर टक्के भरला. त्यानंतर संबंधित घोड विभागाने पाण्याचे योग्य नियोजन करून त्यामधून एक आवर्तन नदीपात्रात सोडले. तर डाव्या-उजव्या कालव्याला खरीप, रब्बी व उन्हाळी दोन अशी चार आवर्तन सोडण्यात आली. दरम्यान ३० मे रोजी जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला असून जलाशयात १ हजार ८३ दशलक्ष घनफूट) मृत पाणीसाठा शिल्लक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT