Soybean Seeds
Soybean Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Seeds : स्वतःचे सोयाबीन बियाणे वापरा

Team Agrowon

डॉ. पी. जी. पाटील

Soybean Farm Management : सोयाबीन हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत तेलबिया विकास योजनेतील महत्त्वाचे पीक आहे. गतवर्षी राज्यात सुमारे ४९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. सोयाबीनच्या फुले संगम, फुले किमया, फुले दूर्वा यांसारख्या जास्त उत्पादन देणाऱ्या जातींच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. २०१८ ते २०२१ या काळात सोयाबीन दरात तेजी राहिल्याने महाराष्ट्रात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रामध्ये वेगाने वाढ झाली आहे. यामुळे दरवर्षी बियाण्याची मागणी वाढत आहे.

सोयाबीन बियाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन कृषी विद्यापीठांनी मूलभूत बियाणे उत्पादित करून त्याचा पुरवठा महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांना करावा, जेणेकरून या कंपन्या मूलभूत बियाण्यापासून पायाभूत व प्रमाणित बियाणे उत्पादित करून त्याचा शेतकऱ्यांना पुरवठा करतील असा शासन निर्णय २०२१ मध्ये जारी करण्यात आला.

या निर्णयानुसार राज्यातील कृषी विद्यापीठे मागणीप्रमाणे सोयाबीन मूलभूत बियाणे उत्पादित करीत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या वर्षी सोयाबीनच्या मूलभूत बियाण्यांची २,३०० क्विंटल लक्षांक असताना, ४,५०० क्विंटल बियाणे उत्पादित केले आहे. महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, शेतकरी उत्पादक कंपन्या व खासगी बियाणे उत्पादक बियाणे उत्पादक कंपन्यांना १२८ रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध करण्यात आले आहे.

बियाणे उत्पादक कंपन्यांना विक्री करून शिल्लक राहिलेले मूलभूत बियाण्याचे सत्यप्रत बियाण्यात रूपांतर करून १०० रुपये प्रति किलो या दराने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मूलभूत बियाणे विक्रीचे दर कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून निश्‍चित होतात, मागील दोन वर्षांपासून सोयाबीनच्या मूलभूत बियाण्याच्या विक्री किमतीत कोणतीही वाढ केली नसताना खासगी कंपन्यांकडून सत्यप्रत बियाण्याच्या दरात प्रती बॅग ३०० ते ६०० रुपये वाढ करून बियाण्याचे दर १८० ते २०० रुपये प्रति किलोपर्यंत वाढवणे अनाकलनीय आहे.

सद्यःस्थितीत बाजारपेठेत दरात घट होऊन २०२१ च्या ८,००० रुपये प्रति क्विंटल या सरासरी दरावरून वरून ४,५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. दुसऱ्या बाजूला बदलत्या हवामानामुळे सोयाबीनवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. कीटकनाशके व खते यांच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्च मात्र वाढत आहे. यातच बियाण्याच्या दरातील वाढीचा भार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर पडणार आहे.

सोयाबीन हे स्वपरागीभवन प्रकारातील पीक असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे स्वतः तयार करून त्याचा वापर करणे फायदेशीर आहे. स्वतःचे बियाणे तयार करताना विषाणूजन्य रोगापासून मुक्त असावे, मळणी यंत्रातील शिल्लक धान्याची बियाण्यामध्ये भेसळ नसावी. फुटके बियाणे नसावे

बियाणे साठवण करताना गोणीची आदळआपट करू नये. गोणीची एकावर एक थप्पी लावू नये. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. उगवण क्षमता तपासणीसाठी सोयाबीनच्या १०० बिया मोजून गोणपाटावर रांगेत मांडाव्यात. त्यानंतर गोणपाटाची हळुवार गुंडाळी करून त्यास पाण्यामध्ये ओले करून अंधाऱ्या खोलीत ठेवावे. ८ ते १० दिवसांनी मोड आलेल्या बिया मोजाव्यात.

७० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण क्षमता असणारे बियाणे पेरणीसाठी वापरावे. पुरेसा पाऊस झाल्यानंतरच (७५ मिमी) पेरणी करावी, जेणेकरून बियाणे पूर्ण क्षमतेने उगवेल. पेरणीसाठी बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर करावा. यामुळे बियाणे योग्य खोलीवर पेरले जाईल, पेरणीसाठी बियाणे कमी प्रमाणात लागेल.

डॉ. कैलास घागरे, ७५८८६९५३५९

( बीजोत्पादन अधिकारी,बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी)

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain : माॅन्सूनचा प्रवास सुसाट; पावसाचाही अंदाज; राज्यातील अनेक भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज

Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र? दरमहा मिळणार १५०० रुपये

Soybean, Cotton Rate: कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Solar Pump Scheme : शेतकऱ्यांसाठी 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा

Budget 2024 : राज्यातील महिलांना मिळणार दरमहा १ हजार ५०० रुपये; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT