Agriculture AI News  Agrowon
ॲग्रो विशेष

AI In Agriculture : शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीबरोबरच शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्राधान्याने करावा

Agriculture Technology : सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेतीच्या शासनाने सुरू केलेल्या योजना आपली शेती आणि आरोग्य सुधारण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेतीच्या शासनाने सुरू केलेल्या योजना आपली शेती आणि आरोग्य सुधारण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या आहेत. शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी, कीड-रोग याच्या प्रादुर्भाव आगाऊ माहिती मिळून त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआय तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतात करावा, त्याबाबतचे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

आत्मा यंत्रणा, कृषी विभाग अंतर्गत गुडाळ, (ता. राधानगरी) येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आत्मा विभागाने सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याबाबत प्रात्याक्षिक सादर केले. हुमणी कीड व्यवस्थापन मोहिमाविषयी प्रात्यक्षिकद्वारे उपस्थितांना माहिती देण्यात आली.

सेंद्रिय शेतीत चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सहभागी लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप करण्यात आले. गुडाळेश्‍वर शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले. आत्‍माच्या प्रकल्प संचालक श्रीमती रक्षा शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. शांतिकुमार पाटील व ऋतुराज चव्हाण यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सेंद्रिय शेतीचे विविध पैलू आणि तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. यामध्ये ऊस पाचट, माती परीक्षण महत्त्व, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, हिरवळीचे खत फायदे, नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकांवरील कीड व रोगांचे नियंत्रण कसे करायचे, याबाबत सविस्तर माहिती दिली.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, राधानगरी तालुका कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. गगनबावड्याचे तंत्रज्ञान व्यवस्थापक पराग परीट यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Farming : संकट असतंच, पण हार मानून कसं चालंल!

October Heatwave : ‘ऑक्टोबर हीट’चा चटका कायम

Soybean Procurement : हमीदराने सोयाबीन खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करा

Labor Migration : रोजगाराअभावी पुसद तालुक्‍यात मजुरांचे स्थलांतर

Crop Damage Compensation : नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी २८.५३ कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT