Maratha Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून विधानसभा-विधानपरिषदेत गदारोळ; विरोधक-सत्ताधारी आमने सामने

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महायुती सरकारची धावाधाव सुरू झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांची बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बोलावली होती. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. त्यावरून पावसाळी अधिवेशनाच्या ११ व्या दिवशी बुधवारी (ता. १०) जोरदार गदारोळ झाला. विधानसभा आणि विधानपरिषदेत सत्ताधारी आमदार आणि विरोधक आमने-सामने आल्याने विधानसभेचे कोमकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. तर विधानपरिषदेचे पूर्ण दिवसासाठी कामकाज तहकूब करावे लागले.

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी आणि महायुती सरकार यामध्ये चांगलीच जुंपली आहे. आरक्षणावरून राज्यात वातावारण तापले असतानाच याची धग आता पावसाळी अधिवेशानात देखील पाहायला मिळाली.

अशिष शेलार यांचा प्रश्नांचा भडीमारा

अधिवेशनाच्या कामकाजाच्या सुरूवातीलाच आरक्षणाच्या बैठकीवरून गोंधळ उसळला. मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला विरोधकांनी दांडी का मारली? असा सवाल अशिष शेलार यांनी करत विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच याचमुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला. तर विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे. विरोधकांना ना मराठ्याशी काही घेणं देणं आहे आणि नाही ओबीसींशी असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला.

यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलत असतानाच शेलार यांनी, जेंव्हा सरकारने बोलवले तेंव्हा का आले नाहीत? असा सवाल करताना विरोधकांवर प्रश्नांचा भडीमार केला. यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार जुंपल्याने सभागृह आधी १० मिनिटं आणि त्यानंतर ४५ मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.

वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाना

यावेळी वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाना साधताना टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, याच्या आधी मराठा-ओबीसी समजाच्या आरक्षणाबाबत आम्हाला चर्चेसाठी बोलावलं गेलं नाही. एकीकडे मुख्यमंत्री जरांगे यांना भेटण्यासाठी गेले. तर दुसरीकडे दुसरे उपमुख्यमंत्री ओबासी नेत्यांच्या भेटीला गेले. पण आंदोलन न थांबवता फक्त स्थगित करून आले असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

तर सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांसह ओबीसींना कोणते आश्वासन दिले याबाबत कोणतीच माहिती दिली नाही. तर विरोधकांनी विश्वासात घेतलं गेलं नाही. तर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मराठा आरक्षणावर वक्तव्य केलं होतं. तर सत्ताधाऱ्यांकडे २०६ सदस्यांचे बहुमत असतानाही दोन्ही समाजांना झुलवत ठेवण्याचे काम सत्ताधारी महायुतीने केल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

भुजबळ यांचे वक्तव्य वाद वाढवणारे

यावेळी वडेट्टीवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसी आंदोलनास्थळावरील वक्तव्याचा समाचार देखील घेतला. तर भुजबळ यांचे वक्तव्य वाद वाढवणारे आहे की मिटवणारे असा सवाल केला. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर न राहण्याचे कारण देखील वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. वडेट्टीवार म्हणाले, मराठा आणि ओबीसी समाजांना काय आश्वासने दिली आहेत. त्यावर बैठकीत चर्चा न करता सभागृहाच्या पटलावर ठेवा. यामुळे सरकारची नक्की काय भूमिका आहे ते राज्यातील जनतेला कळेल. पण सत्ताधाऱ्यांना असे करायचे नाही. तर राज्यातील सत्ताधाऱ्यांचे भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे उघड आता होत असून ते जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून आता सोंग घेतलं जात असल्याचा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.

विधानपरिषदेतही गदारोळ

यादरम्यान विधानपरिषदेत देखील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून गदारोळ झाला. यावेळी उपसभापतींकडून कामकाज रेटण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला. याच प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांनी देखील गोंधळ घातल्याने उपसभापतींनी गदारोळ करणाऱ्या सदस्यांना बाहेर काढण्यासाठी मार्शल बोलावले. तर विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT