Highway Agrowon
ॲग्रो विशेष

State Highway : बीड जिल्ह्यातील १५ प्रमुख रस्त्यांची राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नती

Team Agrowon

Beed News : जिल्ह्याच्या परळी वैद्यनाथसह अंबाजोगाई, केज, धारूर, माजलगाव, वडवणी, बीड पाटोदा व शिरूर कासार या तालुक्यातील १५ प्रमुख रस्त्यांना त्यांची दर्जा उन्नती करून राज्य मार्गाचा दर्जा देण्यात येत असल्याचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्गमित केला आहे.

जिल्ह्यातील १५ प्रमुख रस्ते यामधून चकाचक होणार असल्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले. यासंदर्भातील माहितीनुसार, श्री. मुंडे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंतांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग अशा १५ रस्त्यांची राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नती करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला होता.

त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली. याबाबतचे दोन शासन निर्णय नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत. परळी तालुक्यातील मालेवाडी हाळम ते नागदरा ते राज्य मार्ग ५४८ (लांबी २३ किमी), राज्यमार्ग ५४८ ते जोडवाडी, धसवाडी, उजनी भतानवाडी, बाभळगाव, भवानवाडी, पट्टीवडगाव, पिंपरी चंदनवाडी, तांदुळवाडी, लिमगाव (लांबी २९ किमी), दैठणा घाट, हाळम, दौंडवाडी, घाटनांदुर, चोथेवाडी, लिंबगाव, बर्दापूर लांबी (४३ किमी), मुरंबी नवाबवाडी, घाटनांदुर ते राज्य मार्ग ५४८ (लांबी १० किमी),

जिजिमा ९३ सायगाव, भारत जवळगाव, गिरवली बावणे ते राज्य मार्ग ५४८ ब (लांबी २५ किमी), नाथरा, इंजेगाव राज्य मार्ग ५४८ ब देशमुख टाकळी, पांगरी, नागापूर, साकुड, अंबाजोगाई ते राज्य मार्ग २३५ (लांबी ३३ किमी) त्याचबरोबर राज्य मार्ग ३६१ टोकवाडी, नागापूर, मांडेखेल, नागपिंपरी, बोधेगाव, कावळेवाडी, म्हातारगाव, कान्नापूर, हिंगणी, कासारी, बोडका कारीमार्गे उपळी (लांबी ५० किमी), प्रतिमा ५२ बोधेगाव, राक्षस वाडी, चिचखंडी, भावठाणा, धावडी, डोंगरपिंपळा, सनई, मोरेवाडी, राज्यमार्ग ५६ ते अंबाजोगाई गीता जवळगाव, लिमगाव,

हातोला ते प्रतिमा ५७ (लांबी ४८ किमी), प्रतिमा १८ ते धनेगाव, नायगाव, सौंदना, इस्थळ, आपेगाव, धानोरा, देवळा राज्य मार्ग २११ ते धानोरा बुद्रुक, मुडेगाव, नांदगाव, बर्दापूर, तळेगाव, निरपणा उजनी ते राज्य मार्ग ५४८ ड (लांबी ६८ किमी), राज्य मार्ग ६१ ते खरात आडगाव, टाकळी, आनंदगाव, राज्य मार्ग ३६१ दिंद्रुड, आडस, होळ बोरी, सावरगाव ते बनसारोळा इस्थळ ते बीड जिल्हा हद्द (लांबी ७० किमी), राज्यमार्ग ५५ ते परडी, माटेगाव, चिंचाळा, कुप्पा राज्यमार्ग ३६१ ते उपळी, गावंदरा काटेवाडी, भोगलवाडी, पिंपळवाडी, असोला, आवरगाव ते राज्य मार्ग २३२ (लांबी ३८ किमी), देवगाव,

ॲग्रो विशेष

विडा सिंधी फाटा येवता, कोळवाडी, तरनळी ते राज्य मार्ग ५४८ सी धारूर, असोला, अंजनडोह ते मुरळी राज्यमार्ग २११ (लांबी ४५ किमी), डोंगर किनी ते वंजारवाडी, रायमोहा, खालापुरी, साक्षाळ पिंपरी, शिरस मार्ग कामखेडा, माळापुरी, कुर्ला कुक्कडगाव, नाथापूर, रंजेगाव ते पिंपरखेडा, वडवणी, बीड, जिवाचीवाडी, सोनेगाव,

आनंदगाव ते पैठण राज्य मार्ग रस्ता ६४ (लांबी १४५ किमी), राज्य मार्ग २२२ ते दहिफळ, वडमावली, देवगाव, शिरूर घाट पट्टी घाट ते प्रतिमा ४० बीड जिल्हा हद्द (लांबी ४० किमी) आणि राज्यमार्ग ६१ पवारवाडी ते मोगरा, डिग्रस, पोहनेर, कासारवाडी, कोडगाव हुडा ते राज्यमार्ग २३५ (लांबी २९ किमी) या १५ रस्त्यांची दर्जोन्नती होणार, असल्याचे श्री मुंडे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Crop Loan : पीककर्जासाठी सीबिल धोरण बदला

Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Orange Crop Damage : संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

SCROLL FOR NEXT