Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पूर्वमोसमी पाऊस, वादळामुळे ७६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Heavy Rain Parbhani : परभणी जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी १४.२ मिमी अपेक्षित असताना यंदा प्रत्यक्षात १३१ मिमी (९२२.५ टक्के) म्हणजेच ९२.२५ पट पाऊस झाला.३८ मंडलांमध्ये १०० मिमीपेक्षा तर ३ मंडलात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यात यंदाच्या (२०२५) मे महिन्यातील पूर्वमोसमी पाऊस, वादळामुळे ८ तालुक्यांतील १३५ गावांतील १ हजार ४६७ शेतकऱ्यांच्या जिरायती पिकांचे २५.८० हेक्टर, बागायती पिकांचे २५२.६० हेक्टर, फळपिकांचे ४८७.५० हेक्टर मिळून एकूण ७६५.७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाले आहे.

बाधित शेतकऱ्यांना ३ हेक्टर मर्यादेत आर्थिक मदत देण्यासाठी २ कोटी ४७ लाख १८ हजार ३६० रुपये निधी आवश्यक आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. परभणी जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी १४.२ मिमी अपेक्षित असताना यंदा प्रत्यक्षात १३१ मिमी (९२२.५ टक्के) म्हणजेच ९२.२५ पट पाऊस झाला.३८ मंडलांमध्ये १०० मिमीपेक्षा तर ३ मंडलात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.

शेतकऱ्यांच्या जिरायती,बागायती,फळपिकांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घड काढणीस आलेल्या केळी बागांतील झाडे मोडून पडल्याने परभणी, सेलू, मानवत, पाथरी आदी तालुक्यातील केळी उत्पादकांचे अतिशय नुकसान झाले. भाजीपाला पिकासह आंबा तसेच इतर फळपिकांना देखील वादळाने तडाखा दिला.

पंचनामे पूर्ण झाल्यानंतर बाधित क्षेत्राची आकडेवारी स्पष्ट झाली. जिरायती पिकांचे सेलू, पाथरी, पालम तालुक्यात २५.२० हेक्टर नुकसान झाले आहे. बागायती पिकांचे परभणी तालुक्यात १४ हेक्टर, सेलू तालुक्यातील ४.२० हेक्टर, मानवत तालुक्यात ०.३७ हेक्टर, पाथरी तालुक्यात ११.३० हेक्टर,सोनपेठ तालुक्यात २२१.६१ हेक्टर,पूर्णा तालुक्यातील १.१२ हेक्टर मिळून एकूण २५२.६० हेक्टर नुकसान झाले आहे.

फळपिकांचे परभणी तालुक्यातील २१६ हेक्टर, जिंतूर तालुक्यातील ९ हेक्टर, सेलू तालुक्यातील १४.६० हेक्टर, मानवत तालुक्यातील ३३.२० हेक्टर, पाथरी तालुक्यातील १७७.४० हेक्टर, सोनपेठ तालुक्यातील २३.१२ हेक्टर, पालम तालुक्यातील ११.३५ हेक्टर, पूर्णा तालुक्यातील२.८३ हेक्टर मिळून एकूण ४८७.५० हेक्टरवरील नुकसान झाले आहे.

परभणी जिल्हा मे २०२५ पूर्वमोसमी पाऊस पिकनुकसान स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका बाधित

गावे बाधित शेतकरी एकूण बाधित क्षेत्र आवश्यक निधी

परभणी ५० ४२४ २३० ८१ लाख ५४ हजार रुपये

जिंतूर ३ ६ ९ ३ लाख २४ हजार रुपये

सेलू ६ ५१ २२.६० ६ लाख ९० हजार ६८० रुपये

मानवत १५ ४१ ३३.५७ १२ लाख ५ हजार १९० रुपये

पाथरी २१ ३७८ २०८.९० ६९ लाख ६६ हजार २२० रुपये

सोनपेठ ३४ ५४४ २४४.७३ ६८ लाख १५ हजार ७९० रुपये

पालम २ १३ १२.९५ ४ लाख ३० हजार ३६० रुपये

पूर्णा ४ १० ३.९५ १ लाख ३२ हजार १२० रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: राज्यात ‘लम्पी स्कीन’ पुन्हा डोके वर काढतोय

Jan Suraksha Bill: ‘जनसुरक्षा’ दोन्ही सभागृहांत मंजूर

Animal Husbandry Status: पशुपालनाला आता कृषी समकक्ष दर्जा

Cotton Mission 2030: देश कापूस क्षेत्रात २०३० पर्यंत स्वयंपूर्ण करणार

Soyabean Oil Price: सोयातेलाच्या भावात ३० टक्क्यांनी वाढ

SCROLL FOR NEXT