Grape Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Season : अवकाळीमुळे द्राक्षांचा हंगाम लांबणीवर ; तुरळक आवक; दरात सुधारणा

Grape Market : डिसेंबर उलटून गेला तरी बाजारात द्राक्षांची हवी तशी आवक झालेली नाही. अवकाळीचा फटका द्राक्षाच्या बागांना बसल्याने हंगाम लांबला आहे.

Team Agrowon

Grape Production : वाशी : डिसेंबर उलटून गेला तरी बाजारात द्राक्षांची हवी तशी आवक झालेली नाही. अवकाळीचा फटका द्राक्षाच्या बागांना बसल्याने हंगाम लांबला आहे. त्यामुळे ग्राहकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. हिवाळ्यात द्राक्ष पिकाला बहर येतो.

नोव्हेंबर-डिसेंबरच्या काळात फळ बाजार काळ्या-हिरव्या टपोऱ्या मण्यांनी भरलेले द्राक्षांचे घड नागरिकांचे लक्ष वेधून घेत असतात. वाशीच्या एपीएमसी फळ बाजारात नोव्हेंबरच्या मध्यापासूनच द्राक्षे येऊ लागतात. डिसेंबरमध्ये नाताळनिमित्त द्राक्षांना चांगला भावही मिळतो.

यंदा एपीएमसीत द्राक्षांची अगदी तुरळक आवक पाहायला मिळत असून, त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. बाजारात महाराष्ट्रातून फार कमी प्रमाणात द्राक्षे येत आहेत. अवकाळीचा फटका बसल्याने द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हंगाम सुरू होऊनदेखील बाजारात द्राक्षे मिळत नसल्याने ग्राहकांचा काहीसा हिरमोड झाला आहे.

घाऊक बाजारातील

भाव (१० किलो)

काळी द्राक्षे

१,६०० रुपये

हिरवी द्राक्षे

१,१०० रुपये

अनेक शेतकऱ्यांचा माल त्यांच्या बांधावरूनच खरेदी केला जात असल्याने एपीएमसी फळ बाजारात मागणी असूनही द्राक्षे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत द्राक्षाचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे यंदा भाव चढेच राहण्याची शक्यता आहे. इतर राज्यांतून माल आल्यास भावामध्ये काहीसा फरक पडेल. नाशिकहून येणारी द्राक्षे जानेवारीच्या १५ तारखेनंतर बाजारात येऊ लागतील, तोपर्यंत बाजारात भाव चांगला राहील.

- जितेंद्र मुरकुटे, व्यापारी, एपीएमसी

मागणी जास्त, पुरवठा कमी

वाशी बाजार समितीत सध्या महाराष्ट्रातील बारामती, तासगाव या ठिकाणांहून द्राक्षे विक्रीसाठी येत आहेत. काही प्रमाणात कर्नाटकातूनही येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. १ जानेवारीला ५७९ क्विंटल आवक झाली. त्या वेळी किलोला ६० ते ९० रुपये दर होता. सध्या काळी आणि हिरवी द्राक्षे उपलब्ध असून, मालाचा पुरेसा पुरवठा नसल्याने भाव वाढले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Saving Habit : बचत म्हणजे पैशांनी स्वातंत्र्य विकत घेणे

FPO Ranking Maharashtra : ‘एफपीओं’साठी अनुकूल राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल

Bhavantar Yojana : भावांतराचे घोडे अडते कुठे?

Microfinance Loan Crisis : मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवाटपाला घरघर

Maratha Reservation : राज्यातील अडीच कोटी मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या

SCROLL FOR NEXT