Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : पश्चिम विदर्भात अवकाळी पाऊस

Crop Damage : अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत गुरुवारी (ता.१५) सायंकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस झाला. यावेळी विजांचाही मोठा कडकडाट झाला.

Team Agrowon

Akola News : अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत गुरुवारी (ता.१५) सायंकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस झाला. यावेळी विजांचाही मोठा कडकडाट झाला. वीज पडून शेगाव तालुक्यातील टाकळी विरो शिवारात पेट्रोल पंपावर काम करीत असलेला युवक सूरज सुभाष निंबाळकर (वय २२) याचा मृत्यू झाला.

या भागात गुरुवारी (ता. १५) सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला. अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात अनेक गावांमध्ये सायंकाळी साडेसात वाजेपासून तर रात्री साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान हा पाऊस सुरू होता. या तालुक्यात अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान झाले.

बुलडाणा जिल्ह्यात शेगाव, खामगाव तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. संग्रामपूर तालुक्यात हलक्या सरी काही ठिकाणी झाल्या. बाळापूर, शेगाव, खामगाव या तीन तालुक्यांमध्ये या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. शेगाव तालुक्यातील टाकळी विरो परिसरात वीज पडल्याने सूरज निंबाळकर या तरुणाचा मृत्यू झाला.

वाशीममध्ये धान्य भिजले

वाशीममध्ये दुपारी बाजार समिती परिसरात जोरदार सरी आल्या. या वेळी शेतमालाची खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरू होती. आवारात ठेवलेले सुमारे ५०० पोत्यांवर अधिक माल या पावसात भिजला. यातील बहुतांश माल हा व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला होता. तर काही माल शेतकऱ्यांचाही होता.

या परिसरातच अधिक प्रमाणात अचानक पाऊस आल्याने सर्वांची पळापळ झाली. पावसाची कुठलीही चिन्हे नसताना अचानक सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना माल झाकण्यासही वेळ मिळू शकला नाही. परिणामी ओल्या झालेल्या मालामुळे नुकसान झाले.

मदतीची मागणी

अचानक पाऊस व हवामानाबद्दल मुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शासनाने त्वरित पीकविमा कंपनी तसेच महसूल, कृषी विभागाला आदेश देऊन सर्व्हे करण्याचे आदेश देत नुकसान भरपाई संदर्भात कारवाई करावी अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

विदर्भात मोठ्या प्रमाणात तूर, गहू पिकाचे तसेच संत्रा बागांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी येत आहेत. या संदर्भात नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश महसूल विभाग व कृषी विभाग व जिल्हाधिकारी यंत्रणेला देण्याची मागणी त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT