Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

Rain Update : सातारा जिल्ह्यात बुधवारी (ता.१७) दुपारी सातारा, जावळी, वाई, कोरेगाव, फलटण आदी तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यात बुधवारी (ता.१७) दुपारी सातारा, जावळी, वाई, कोरेगाव, फलटण आदी तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारांनी झोडपून काढले. जोराचे वारे वाहू लागले. ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट सुरू झाला. या पावसाने काढणीला आलेला कांदा व ज्वारी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. काही ठिकाणी आंब्याच्या बागांचेही नुकसान झाले आहे.

सातारा तालुक्यातील अतित, नागठाणे, काशीळ परिसरांत सायकांळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. फलटण शहरासह तालुक्यातील राजाळे, निंबळक, पिंप्रद, टाकळवाडे भागांत पावसाच्या सरी बरसल्या आहेत. ढगांच्या गडगडासह वाऱ्यासह पाऊस पडला.

तालुक्यात अनेक ठिकाणी सायंकाळी चारच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला आहे. कोरेगाव शहर परिसरात सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात काही ठिकाणी पत्र्याचे शेड उडाले. विजेच्या वाहिन्या तुटल्या, झाडांच्या फांद्या पडल्या. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. वादळी वाऱ्यामुळे कोरेगाव एकंबे रोडवरील यबई शिवारात साहेबराव श्रीमंत बर्गे यांचे पत्र्याचे शेड उडाल्याने मोठे नुकसान झाले.

नहरवाडी परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे २० ते २५ पत्र्याचे शेड व घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे नुकसान झाले. या परिसरात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गारांच्या पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे जाधव वस्ती, तोडकर वस्ती, कदम वस्ती व नहरवाडी परिसरातील परिसरात झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

त्याचबरोबर सुमारे २० ते २५ पत्र्यांचे शेड व घरांचे पत्रे उडाले. जावळी तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. अचानक आलेल्या पावसाने मेढा, कुडाळ, करहर, केळघर, आनेवाडी, सायगाव, रायगाव, महामुलकरवाडी, मोरघर, पवारवाडी येथे पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी अजूनही ज्वारी काढणीची कामे सुरू आहे.

त्यामुळे या अवकाळीचा फटका ज्वारी पिकाला तसेच कडब्याला बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे ऊस व फळबागेला या पावसामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. वाई शहर व तालुक्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह विजेच्या व ढगांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला. सुमारे एक तास पाऊस सुरू झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. यावेळी काही भागांत गारांसह पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT