Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : सोलापूर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा

Crop Damage : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. ११) रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

सुदर्शन सुतार

Solapur News : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. ११) रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. उन्हाळी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. तसेच वीज पडल्याने अंजनगाव खेलोबा (ता. माढा) येथे दोन जर्सी गाई आणि काटेगाव (ता. बार्शी) येथे एक बैल अशा तीन जनावरांना आपला जीव गमवावा लागला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान तब्बल ४३ अंश सेल्सिअसवर आहे. त्यात अलीकडच्या दोन दिवसांत १-२ अंशांनी घट झाली असली, तरी सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. मात्र बुधवारी (ता. १०) रात्री पावसाने हजेरी लावली. त्यात फारसा जोर नव्हता, पण गुरुवारी रात्री अनेक भागांत पाऊस झाला.

प्रामुख्याने उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माढा, बार्शी, सांगोला, मंगळवेढ्यात पावसाचा जोर राहिला. माढ्यातील उपळाई बुद्रुक, अंजनगाव खेलोबा, उपळाई खुर्द या भागांत रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्या वेळी अंगावर वीज पडल्याने गणेश सलग यांच्या दोन जर्सी गाई जागेवरच मृत पावल्या. त्याशिवाय उत्तर सोलापुरातील तिरेहे, हिरज, कोंडी, कारंबा भागात हलका पाऊस झाला.

बार्शी तालुक्यातील पानगाव परिसरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याचा आंबा फळांसह इतर फळबागांना मोठा फटाका बसला. त्याशिवाय काटेगाव येथेही विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.

येथील इसार मुबारक पटेल यांच्या शेतात वीज अंगावर पडल्याने बैल दगावला. करमाळा तालुक्यातील पोथरे येथे पावसाने हजेरी लावली. या भागात उन्हाळी कांद्याचे नुकसान झाले. मोहोळ तालुक्यातील नरखेड, देगाव, वाळूज भागात झालेल्या पावसाने आंबा, कलिंगड, द्राक्ष, खरबुजाचे नुकसान झाले.

मंगळवेढ्यात घरावरील पत्रे उडाले

मंगळवेढा तालुक्यातील डिकसळ, येड्राव, भाळवणी येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेले. पत्र्यावर ठेवलेला दगड लागल्याने भाळवणीतील कामाजी अनिल माने हा सात वर्षीय मुलगा जखमी झाला.

डिकसळमध्ये नऊ घरांवरील पत्रे उडाले, तर पाच शेतकऱ्यांच्या आंबा बागांचे नुकसान झाले. त्याशिवाय तीन ठिकाणी कडब्याच्या गंज्या उडून गेल्या. या घटनेनंतर तहसीलदार मदन जाधव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांच्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Food: विविधतेचा बळी देऊन सपाटीकरण कशासाठी?

Agricultural Culture: शेती पद्धती बदलण्याची तीव्र निकड

Gay Gotha Scheme: गायी-म्हशींसाठी गोठा बांधण्यास २.३१ लाखांपर्यंत अनुदान; जनावरांच्या संरक्षणासाठी सरकारची योजना

Rural Farmer Issue: ग्रामीण महाराष्ट्र कर्जबाजारी का होत आहे?

Soybean Farming: सोयाबीन पिकावर वाढू शकतो रोगांचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT