Adulteration Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Adulteration : दुध भेसळीविरुद्ध नेते-कार्यकर्त्यांची एकी

प्रशासनाला ही भेसळ माहिती होती, मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कारण त्यात सेटलमेंट होती.

Team Agrowon

Nagar Milk News : श्रीगोंदे तालुक्यात उघड झालेल्या दूधभेसळीने अनेकांचे डोळे उघडले आहेत. प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता.२३) एकत्र येत तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.

सगळीकडेच छापासत्र सुरू करून या दूधभेसळीतील सूत्रधार शोधा, अशी मागणी करण्यात आली.

श्रीगोंदा तालुक्यात मागील आठवड्यात दूध भेसळीवर छापा टाकण्यात आला. भेसळीची उच्चस्तरीय पातळीवर चौकशी करून रॅकेट उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्या पुढाकाराने झालेल्या आंदोलनात ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, डॉ. प्रणोती जगताप, अॅड. संभाजी बोरुडे, बाळासाहेब नाहाटा, यांच्यासह तालुक्यातील नेते, युवक सहभागी झाले होते.

टिळक भोस म्हणाले, की अनेक वर्षांपासून श्रीगोंदे शहरातील हे भेसळखोर दुधात भेसळ करून करोडो रुपये कमावत आहेत. ही टोळी असून, दुधात केमिकल व पावडर टाकून लोकांचे जीव घेत आहेत.

ती रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे का दुर्लक्ष झाले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. तालुक्यातील रॅकेटचा संबंध आष्टी, करमाळा, शिरूर, पारनेर, नगर, बारामती अशा अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे एकाच वेळी छापे टाकून रॅकेट उद्‍ध्वस्त करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रशासनाला ही भेसळ माहिती होती, मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कारण त्यात सेटलमेंट होती.

काष्टीत टाकलेला छापा व त्यानंतर उशिराने दाखल झालेली फिर्याद, याचीही चौकशी झाली, तर त्यातून सेटलमेंट न झाल्याने फिर्याद आल्याचेच समोर येईल असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Climate Conference: हवामान होरपळ आणि बड्यांची टाळाटाळ

Jowar Farming: ज्वारीचा गोडवा वाढेल!

Grape Farmer Issue: द्राक्ष उत्पादकांवर ३६ कोटींचे कर्ज वसुलीस मुदतवाढीची मागणी

Sugarcane Harvest: ऊस तोडणीच्या तक्रार निवारणासाठी अधिकारी अडवणूक टळणार

Sugarcane Production: दीड एकरांत उसाचे १४२ टन उत्पादन

SCROLL FOR NEXT