Hydrologist Dr. D.M. More Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : ‘समन्यायी पाण्यासाठी एकत्र या’

Team Agrowon

Pandharpur News : ‘‘पाणी हे कोणाच्याच मालकीचे नाही, ते एक सामाईक संसाधन आहे. नदीखोऱ्यातील उपलब्ध पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. ते समन्यायी पद्धतीने मिळविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे निवृत्त संचालक आणि जलतज्ज्ञ दि. मा. मोरे यांनी केले.

पंढरपूर येथे पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ व दक्षिण सोलापूरमधील उजनी लाभक्षेत्रधारकांची विचारविनिमय बैठक झाली. या प्रसंगी श्री. मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे होते. या वेळी आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जकराया शुगरचे अ‍ॅड. बिराप्पा जाधव, विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजित पाटील, प्रणव परिचारक, देवानंद गुंड-पाटील, माजी मुख्य अभियंता बबन तोंडे, सेवानिवृत्त जलसंपदा अधिकारी संभाजी गरड, मंगळवेढा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख येताळा भगत, शेतकरी समन्वय समितीचे सदस्य सीताराम रणदिवे, डीआरएमचे संचालक अमोल रणदिवे, अंकुश पडवळे आदी उपस्थित होते.

श्री. मोरे म्हणाले, ‘‘उजनी धरणात मृतजलसाठा मोठा आहे. पाण्याची काय किमया असते, हे पाहायचे असेल तर उजनीकडे पहावे. २००५ च्या कायद्यानुसार पाण्यासंदर्भात अधिकार ठरवण्याचे काम शेतकऱ्यांच्या हाती देण्यात आले आहे. परंतु शेतकऱ्यांना याविषयी माहिती नसल्याने समन्यायी पद्धतीने पाणी मिळवण्यात शेतकरी कमी पडतो आहे. उजनीतील पाणी हे खोऱ्याचे पाणी आहे.

लाभक्षेत्रधारकांनी नव्याने स्थापन केलेल्या संघटनेने कायद्यानुसार काम करत राहावे. उजनीच्या वरच्या भागात एकूण २२ धरणे आहेत. पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर सर्वांत आधी वरील आणि त्यानंतर खालील धरणे भरली जातात. यामध्ये उजनी धरणाचा रांगेत शेवटचा क्रमांक लागतो. या लाभक्षेत्रातील धरणांना पावसाच्या पाण्याचे ''नदी खोरेनिहाय जलव्यवस्थापन'' या तत्त्वानुसार पावसाचे समान पाणी वाटप केले, तर उजनीत पुरेसे पाणी येऊ शकते आणि दरवर्षी ते उणेमध्ये जाण्याची शक्यता कमी होऊ शकते.’’

प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, ‘‘नागनाथअण्णा, आर. आर. पाटील यांनी सुरुवातीला दुष्काळी भागातील लोकांसाठी पाण्याचे स्वप्न बघितले, त्यावेळी हे पाणी दुष्काळी भागात येईल, यावर लोकांना विश्वास बसत नव्हता. परंतु आता ते सत्यात उतरले आहे. भाई गणपतराव देशमुख यांनी फार मोठे योगदान दिले. त्यांनी उभारलेली ही पाणी संघर्ष चळवळ आज शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. त्याला आणखी बळ देण्याची गरज आहे.’’

उजनी सजग शेतकरी संघ स्थापन

उजनी लाभ क्षेत्रातील शेतकरी बैठकीमध्ये शेतकऱ्यांची संघटना काढण्याचे ठरावाद्वारे एकमुखाने ठरविण्यात आले. त्यानुसार उजनी लाभक्षेत्र सिंचन सजग शेतकरी संघ, सोलापूर अशी संघटना काढण्याचे ठरले व या नियोजित संघाच्या अध्यक्षपदी प्रा. शिवाजीराव काळुंगे यांची एकमताने निवड करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT