Farmers' Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers' Protest : कंगनानंतर केंद्रीय मंत्री खट्टर यांचे शेतकरी आंदोलनावर भाष्य, म्हणाले, 'आंदोलनात बसलेले शेतकरी नाहीत, ते...'

Aslam Abdul Shanedivan

Pune News : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शेतकरी आंदोलनावरून बुधवारी (ता.२५) वक्तव्य केलं आहे. खट्टर यांनी पंजाब आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर टीका करताना, आंदोलन करणारे लोक शेतकरी नसल्याचे म्हटले आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काहीच दिवसांनी हरियाणात विधानसभेची निवडणूक होणार आहे. याआधी खासदार कंगना राणौत आणि आता खट्टर यांचे शेतकरी आंदोलनाबाबत विधान आल्याने भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खट्टर अंबाला येथे पक्षाच्या कार्यक्रमासाठी आले होते.

खट्टर यांनी शंभू सीमेवर खनौरी येथे आंदोलन करणारे शेतकरी नाहीत. लवकरच सर्वोच्च न्यायालय अशा लोकांना पंजाबकडे जाण्यापासून रोखण्यासाठी निर्णय देईल, असे म्हटले आहे. खट्टर म्हणाले, सध्या एक महत्वाचा मुद्दा असून पंजाबला जाणारा रस्ता बंद आहे. सरकारने हा रस्ता उघडण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. पण आंदोलन करणारे शेतकरी नाहीत. शेतकरी आंदोलनाच्या आडून काही लोकांना राज्यातला कायदा बिघडवायचा आहे. ते कोण आहेत? हे जनतेला माहित आहे. तर हरियाणाची जनतेला आनंद आहे की त्यांनी अशा लोकांना राज्यात पाय ठेवू दिला नाही.

सरकार अशा लोकांच्याविरोधात न्यायालयात गेले. आम्ही आमची बाजू मांडली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाने एक समिती स्थापन केली आहे. लवकरच समिती तोडगा काढण्यासाठी बैठक घेईल. मात्र स्वत:ला शेतकरी म्हणवून घेणाऱ्यांनी आपली मर्यादा ओलांडू नये. यासाठी त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रही घेतले जाईल. तर सीमा उघडल्यानंतर जे काही होईल याची जबाबदारी त्यांची असेल. याबाबत न्यायालयच निर्णय घेईल. तर सर्वोच्च न्यायालय स्वतंत्रपणे लोकांच्या सुविधेची दखल घेत असल्याचेही खट्टर यांनी म्हटले आहे.

तसेच शंभू सीमेवर शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर खट्टर म्हणाले की, हे लोक फक्त शेतकऱ्यांचा मुखवटा लावत आहेत. कारण प्रगतशील शेती करणं आणि उत्पादन वाढवणे शेतकऱ्यांचे काम आहे. याआधी शेतकऱ्यांनी तीन कृषी कायद्यांचा विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते परत घेतले. यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. पंतप्रधानांना वाटले की इतका विरोध होत असेल तर कायदे मागे घ्यायलाच हवेत. आता तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत. यामुळे कोणताही मुद्दा उरलेला नाही.

दरम्यान बुधवारी (ता.२५) तीन कृषी कायद्यांबाबत त्यांच्याच पक्षाच्या खासदार कंगना रणौत हिने वादग्रस्त वक्तव्य केलं होत. कंगनाने तीनही कृषी कायदे परत आणावेत, असे विधान केले होते. कंगणाच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसह शेतकरी संघटनांनी जोरदार टीका केली होती. आता खट्टर यांनी असे विधान करून हरियाणातील शेतकऱ्यांना डिवचण्याचे काम केलं आहे. खट्टर यांच्या विधानाचा शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर यांनी निषेध केला आहे. शेतकरी आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपचे नेते अशी बेताल वक्तव्य करत आहेत. याचे उत्तर हरियाणाची जनता खट्टर आणि भाजपला देईल, असेही पंढेर यांनी म्हटले आहे.

पंढेर यांनी कंगनाच्या विधानाचा देखील समाचार घेताना, कंगनावर कारवाई झाली पाहिजे, तिच्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी माफी मागून कायदे मागे घेतले. आता भाजपचे खासदार माफी मागत आहेत. पण वैयक्तिक सूचना करण्यापेक्षी कंगनावर पक्षाने कारवाई करावी, असे पंढेर यांनी म्हटले आहे. तर कंगनाचे वक्तव्य वैयक्तिक मत नाही. ते भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप शेतकरी नेते हरिंदरपाल लखोवाल यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhananjay Munde : उद्याच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान ६५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंची पुन्हा ग्वाही

Bogus Fertilizer : बोगस निविष्ठा प्रकरणात कृषी विभागाची भूमिका संशयास्पद

Cotton Productivity : सघन कापूस लागवड उत्पादकता वाढीस पूरक

Rabi Season 2024 : रब्बीसाठी तीन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

Agriculture Awards : सरकारच्या कृषी पुरस्कार गोंधळ; शेतकऱ्यांच्या रोषानंतर कार्यक्रम सुरू

SCROLL FOR NEXT