Palghar Wadhwan Port  Agrowon
ॲग्रो विशेष

Palghar Wadhwan Port : पालघरमधील प्रास्तावित वाढवण बंदराच्या विकासाला गती; केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता 

Union Cabinet meeting : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथील बंदराचा प्रश्न मार्गी लागला आहे. या बंदर उभारणीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी (ता.१९) पार पडली. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील डहाणूजवळील वाढवण येथे उभारण्यात येणाऱ्या बंदरास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे येथे ७६,२०० कोटी रुपये मूल्याचे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट बंदराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या बंदराची निर्मिती जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) आणि महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी) यांच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी जेएनपीए ७४ टक्के आणि एमएमबीचा २६ टक्के समभाग असेल. 

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथील बारमाही ग्रीनफिल्ड डीप ड्राफ्ट प्रमुख बंदराच्या भूसंपादनासह संपूर्ण प्रकल्पासाठी ७६, २२० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मोडमध्ये मुख्य पायाभूत सुविधा, टर्मिनल आणि इतर व्यावसायिक पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळाने बंदराच्या रस्ते आणि रेल्वे जोडणीचा प्रश्न देखील मार्गी लावत रेल्वे फ्रेट कॉरिडॉरला मान्यता दिली आहे.

आयएमईईसी (इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर) आणि आयएनएसटीसी (इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉर) द्वारे या बंदराच्या माध्यमातून व्यापार प्रवाहाला मदत मिळेल. तर जागतिक दर्जाच्या सागरी टर्मिनल सुविधा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) ला प्रोत्साहन देईल. तसेच युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि अमेरिका या देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सक्षम असे अत्याधुनिक टर्मिनल्स तयार होईल. तर वाढवण बंदर हे पूर्ण झाल्यावर जगातील पहिल्या दहा बंदरांपैकी एक असेल.

पीएम गतीशक्ती कार्यक्रमाच्या उद्दिष्टांशी अनुरूप असलेला हा प्रकल्प अनेक गोष्टींना पुरक असेल. या प्रकल्पामुळे येथे १० लाख व्यक्तींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभारही लागेल असेही केंद्रीय प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तसेच प्रस्तावित वाढवण बंदरात प्रत्येकी १००० मीटर लांबीचे नऊ कंटेनर टर्मिनल असतील. यासह किनारी धक्के, चार लिक्विड कार्गो बर्थ, एक रो-रो बर्थ आणि एक तटरक्षक धक्का ही असेल. 

वाढवण प्रकल्पामध्ये समुद्रातील १४४८ हेक्टर क्षेत्राचे पुनर्वसनासह १०.१४ किमी ऑफशोअर ब्रेकवॉटर आणि कंटेनर/कार्गो स्टोरेज क्षेत्रांचे बांधकाम समाविष्ट आहे. हा प्रकल्प दरवर्षी २९८ दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) ची संचयी हाताळणी  क्षमता निर्माण करेल. ज्यामध्ये सुमारे २३.२ दशलक्ष टीईयूएस (वीस-फूट समतुल्य) कंटेनर हाताळणी क्षमतेचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनला मागणी वाढली; मेथीच्या दरात नरमाई, हळद-पपई स्थिर, लसूण भाव स्थिर

Paus Andaj: उद्यापासून पाऊस सुरु होणार; विदर्भ, कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता

Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस

Herbal Plant Conservation : औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी पाऊल

Chia Seed : वाशीममधील चियासीड पोहोचले मुख्यमंत्र्यांपर्यंत

SCROLL FOR NEXT