Shivraj Singh Chauhan Agrowon
ॲग्रो विशेष

Shivraj Singh Chauhan : शेतकऱ्यांचे छोटे-छोटे प्रश्न सोडवल्यास उत्पन्नात २० टक्के वाढ शक्य : कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दर मंगळवारी शेतकऱ्यांशी चर्चा या संकल्पनेप्रमाणे मंगळवारी (ता.१) शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी भारतीय किसान युनियन (स्वतंत्र) च्या नेते आणि सदस्यांची भेट घेतली. यावेळीकृषी क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या विविध आव्हानांवर चर्चा करण्यात केली.

यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी, शेतकऱ्यांची सेवा ही देवाची पूजा असून त्यांचा समस्यांचे निराकरण केल्यास शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटतील, असे म्हटले आहे. तर शेतकऱ्यांच्या समस्या काही मोठ्या नसतात. त्या छोट्या छोट्या असतात. त्या सोडवल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न १० ते २० टक्क्यांनी वाढू शकते, असा दावा देखील शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी केला.

या भेटीत भारतीय किसान युनियन (स्वतंत्र) च्या नेते आणि सदस्यांनी कारखान्यांतील दूषित पाणी आणि जळालेले ट्रान्सफॉर्मर्स ची समस्या सांगितली. तसेच जळालेले ट्रान्सफॉर्मर्स लवकर बदलले जात नसल्यावरून नाराजी व्यक्त केली. तर यावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा, अशा सूचना कृषिमंत्र्यांना दिलेल्या निवेदन केल्या आहेत.

यावेळी पीक खर्च कमी करणे, पिकाला रास्त भाव, पाणी तुंबण्यावर उपाय योजना करण्यावर चर्चा झाली. याशिवाय कीटकनाशकांचा अतिवापर, त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम आणि प्रधानमंत्री फसल विमा योजना यांसारख्या सरकारी योजनांचा लाभ यावरही करण्यात आली.

तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व कीटकनाशकांची उपलब्धता यावर देखील चर्चा करण्यात आली. यावरून कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांनी सूचवलेल्या सूचना लवकरच राज्य सरकारकडे पाठवले जाईल, असे आश्वासन यावेळी भारतीय किसान युनियन (स्वतंत्र) च्या नेते आणि सदस्यांना दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bail Pola : पुणे जिल्ह्यात भाद्रपदी बैलपोळा उत्‍साहात

Agricultural Services Examination : निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या कधी?

Hirda Tree : हिरडा झाडांची सात-बारा उताऱ्यावर होणार नोंद

Kisan Rail : किसान रेल्वेसाठी सोमवारी शेतकरी संघटनांचे आंदोलन

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पुढच्या नऊ हप्त्यांची तरतूद

SCROLL FOR NEXT