Dhananjay Munde  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : वंचित शेतकऱ्यांना वीज बिल सवलतीचा लाभ मिळणार

Electricity Bill Concession : शासनाने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्यस्थिती जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आतापर्यंत ५६ कोटी ८० लाख रुपये वीज बिल सवलत दिली.

Team Agrowon

Beed News : शासनाने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्यस्थिती जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आतापर्यंत ५६ कोटी ८० लाख रुपये वीज बिल सवलत दिली. यातून वंचित राहिलेल्या ३६ हजार शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याची पूर्तता करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

जिल्ह्यातील वीज वितरण व आनुषंगिक बाबींचा आढावा पालकमंत्री श्री. मुंडे यांनी शुक्रवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीस माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी अभियंता एम. डी घुर्मे, कार्यकारी अभियंता अ.ना.पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री मुंडे म्हणाले, की विविध तालुक्यात वीज मंडळाचे काम करणाऱ्या बाह्य यंत्रणांची संख्या कमी आहे. यामुळे त्वरित खंडित वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नाही हे लक्षात घेऊन विभागनिहाय या यंत्रणांची संख्या वाढवून त्वरित सेवा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून वीज वितरण कंपनीने पावले उचलावीत.

कृषी पंप जोडणी जिल्ह्यात आजमितीस कृषी पंपासाठी वीज पुरवठा मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४७७० आहे. ही जोडणी मार्च अखेर पूर्ण होणे अपेक्षित असले तरी याला गती देऊन ही सर्व जोडणी डिसेंबर २०२४ पूर्वी पूर्ण करा अशा प्रकारचे निर्देश श्री मुंडे यांनी यावेळी दिले.शेतकऱ्यांना दिवसा आठ तास व रात्री दहा तास विद्युत पुरवठ्याचे लक्ष समोर ठेवून कामे करा.

उर्वरित शेतकऱ्यांना मिळणार वीज बिल माफीचा लाभ

शासनाने संपूर्ण बीड जिल्हा दुष्काळ सदृश्यस्थितीचा जिल्हा घोषित केला. यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना ३३ टक्के वीज बिल माफीचा निर्णय शासनाने घेतला होता. जिल्ह्यात असलेल्या एक लाख ८३ हजार २८२ कृषी जोडण्यापैकी १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना दर तिमाही २८ लाख ४० लाख याप्रमाणे सवलत प्रदान करण्यात आली आहे.

दोन तिमाही एकूण ५६ लाख ८० हजाराची सवलत शेतकऱ्यांना मिळाली आहे. उर्वरित ३६ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना लाभ द्यायचा बाकी आहे. शासन याबाबत सकारात्मक आहे हा लाभ त्या सर्व शेतकऱ्यांना त्वरित देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री मुंडे यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT