Viksit Krushi Sankalp Agrowon
ॲग्रो विशेष

Viksit Krushi Sankalp: ‘विकसित कृषी संकल्प’अंतर्गत भोरमध्ये १२ गावांत उपक्रम

Agriculture Innovation: कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने आयोजित विकसित कृषी संकल्प अभियान देशभरात १२ जूनपर्यंत राबविण्यात येत आहे.

गणेश कोरे

Bhor News: कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने आयोजित विकसित कृषी संकल्प अभियान देशभरात १२ जूनपर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र बरामती व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने भोर तालुक्यात १२ गावांमध्ये विविध कृषी उपक्रम राबवले जात आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे संजय काचोळे, प्रकल्प संचालक ‘आत्मा’ पुणे सूरज मडके व तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात असलेल्या उपक्रमाद्वारे कृषी तंत्रज्ञानाची माहिती गावोगावी जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

या अभियानात नाविन्यपूर्ण शेती, भात सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, बांबू लागवड तंत्रज्ञान, माती परीक्षणाचे महत्त्व, शेतीमाल ब्रंडिंग व विक्री व्यवस्थापन, बियाणे खते, रोपे आणि विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे.

मार्गदर्शकांनी गावामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जातेय. यामध्ये संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, आत्मा अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ,विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी आहेत. संशोधकांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून शेती व संबंधित व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले.

भोर तालुक्यातील मौजे नाटंबी, खानापूर, उत्रोली, न्हावी, भाबवडे, भोंगवली, पांडे, सारोळा, खडकी, माळेगाव, केळवडे, शिवरे या गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान रबविण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे दुर्लक्ष; नोंदणीला मंद गती

Unseasonal Rain: पश्चिम विदर्भात पूर्वमोसमीचा सलग तडाखा

Marathwada Water Stock: मराठवाड्यात प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटतोय

Village Story: आठवणींची फुलवात...

El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

SCROLL FOR NEXT