Uddhav Thackeray agrowon
ॲग्रो विशेष

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, शाहू छत्रपती महाराज यांची घेणार भेट, सांगलीत जाहीर सभा

Sangli Uddhav Thackeray : ठाकरे यांची मिरज (जि. सांगली) येथे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी ते कोल्हापुरात विमानतळावर येतील.

sandeep Shirguppe

Shiv sena Thackeray Group : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (ता. २१) महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी साडेतीन वाजता नवीन राजवाडा येथे ही भेट घेणार आहेत. ठाकरे यांची मिरज (जि. सांगली) येथे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी ते कोल्हापुरात विमानतळावर येतील. तेथून ते मिरजेला जाण्यापूर्वी शाहू महाराजांची भेट घेणार असल्याचे ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क नेते अरुण दुधवडकर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसला आणि सांगलीतील जागा शिवसेनेला देण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. याच संदर्भातून उद्धव ठाकरे आज मिरज दौऱ्यावर आहेत. तेथे सायंकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे. दुपारी दोनच्या सुमारास ते मुंबईतून कोल्हापूरकडे विमानाने निघणार आहेत.

साधारण तीन-साडेतीनच्या सुमारास ते कोल्हापूर विमानतळावर पोहोचतील. तेथून ते थेट नवीन राजवाडा येथे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेण्यास जातील. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत असतील. नवीन राजवाडा येथे निवडणुकीतील रणनीतीवर चर्चा होईल. येथील चर्चेनंतर मोटारीने ठाकरे थेट मिरजेला रवाना होतील.

महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून शाहू महाराजांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांना काँग्रेसमधून उमेदवारी दिली जाणार असली तरीही ते महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील एक प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरे गटाची कोल्हापूरची जागा केवळ शाहू महाराज असल्यामुळे काँग्रेसला दिली आहे.

काँग्रेसची भूमिका बघ्याची

महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे नाव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर करत सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसचे नेते देखील सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहेत. याच दरम्यान मिरजमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडतीय.

या सभेतून उद्धव ठाकरे चंद्रहार पाटील यांची पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपर्यंत काँग्रेसला जागा मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी देखील 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतल्याचे दिसून येते. याबाबत मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे काँग्रेसकडून इच्छुक आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT