Ujani Dam : उजनीतील लहान मासे मारण्यास प्रतिबंध करा

Fish Farming : मच्छीमारांची पाटबंधारे विभागाकडे मागणी
Ujani Dam
Ujani DamAgrowon

Ujani Fishing : राज्यात गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या यशवंत सागरातील (उजनी धरण) वडाप व पंड्याच्या साह्याने करण्यात येणाऱ्या मासेमारीला प्रतिबंध करण्याची मागणी स्थानिक मच्छीमारांनी निवेदनाद्वारे उजनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

धरणात यंदा सुमारे १ कोटी मत्स्यबीज सोडण्यात आलेले आहे. त्याची पूर्ण वाढ होऊन प्रजनन वाढीसाठी उजनीतील लहान मासळीची मासेमारी करण्यावर काही वर्षे बंदी आणण्याची गरज असल्याचे मत मच्छीमार व्यक्त करत आहेत.

कारवाईची भीती नसल्याने राजरोसपणे करण्यात येणारी लहान मासळीची शिकार थांबविण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर तालुका भोई समाज संघाकडून पुणे-सोलापूर महामार्गावर भीमानगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या वेळी पाटबंधारे कार्यालयासमोर सडके मासे टाकून अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढणार असल्याची माहिती संघाचे युवा प्रतिनिधी अनिल नगरे यांनी दिली.

Ujani Dam
Ujani Dam : उजनीतील गाळ काढण्याचा मुहूर्त कधी?

यंदा उजनी धरणातील पाणीसाठा जानेवारीत उणे पातळीत गेला. यानंतर दीड महिन्यांत उणे पातळीतील सुमारे १० टीएमसी (उणे १८ टक्के) पाणी आतापर्यंत कमी झाले आहे. परिणामी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात सध्या रात्रीच्या वेळी वडाप, पेंडाच्या साह्याने मासेमारीचे प्रकार वाढले आहेत. वारंवार अशा मासेमारीला आळा घालण्याबाबत शासकीय दरबारी हेलपाटे मारत असल्याचे स्थानिक मच्छीमार सांगत आहेत.

कारवाईसाठी नेमलेली समिती उदासीन
धरणातील लहान मासळीच्या मासेमारीला आळा घालण्यासाठी २८ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा, महसूल, पोलिस, मत्स्यव्यवसाय विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक मच्छीमार संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती. कारवाईसाठी
एक समिती स्थापन केली.

उजनी धरणाचे कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे. पुणे, नगर, सोलापूरचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त, दौंड, इंदापूर, माढा, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यांचे तहसीलदार व पोलिस निरिक्षक, करमाळा, इंदापूर, भीमानगर, पळसदेव येथील भीमा उपसा सिंचन उपविभागाचे उपविभागीय अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे उपकार्यकारी अभियंता हे सदस्य सचिव आहेत. मात्र कारवाईच्या बाबतीत समिती उदासीन असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com