Agriculture Department Corruption  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department Corruption : कृषी विभागाच्या लाचखोर तंत्र अधिकाऱ्यासह दोघांना अटक

Corruption Update : निविष्ठा उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकाऱ्यासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

Team Agrowon

Solapur News : निविष्ठा उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकाऱ्यासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

दत्ता नारायण शेटे (वय ४२ वर्षे, पद- तंत्र अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण), नेमणूक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, म्हाडा कॉलनी मोरवाडी, पिंपरी (पुणे) व खासगी इसम प्रमोद वाल्मीक सुरवसे (वय ३९ वर्षे, व्यवसाय शेती, हरीहर महाराज मठाजवळ, पंढरपूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

यातील तक्रारदार यांच्या मालकीची निविष्ठा निर्मितीची कंपनी आहे. या कंपनीत उत्पादन झालेली खते व कीटकनाशकांचे नमुने घेऊन कंपनीवर कोणतीही कारवाई न करण्याकरिता तंत्र अधिकारी दत्ता शेटे याने ५० हजार रुपये लाचेची त्यांच्याकडे मागणी केली. या प्रकाराची माहिती तक्रारदार यांनी लाचलुचपत अधिकाऱ्यांना दिली.

या प्रकाराची खात्री केल्यानंतर सापळा लावण्यात आला. त्यानुसार लाचेची रक्कम खासगी इसम प्रमोद सुरवसे यांच्यामार्फत त्यांच्या शासकीय वाहनामध्ये ठेवत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

सदरची कारवाई सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलिस अंमलदार अतुल घाडगे, सलीम मुल्ला, स्वामीराव जाधव, राहुल गायकवाड यांच्या पथकाने पार पाडली.

शासकीय वाहनात आढळले सहा लाख रुपये

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचेची रक्कम सापडलेल्या शासकीय वाहनाची झडती घेतली असता, वाहनामध्ये लाचेच्या रकमेशिवाय भारतीय चलनी नोटांचे वेगवेगळे १७ बंडल सापडले. त्यामध्ये एकूण ६ लाख १४ हजार रुपये होते. त्या रकमेबाबत शेटे यांनी समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने रक्कम जप्त करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील २०२० च्या पीकविमा भरपाईचा निकाल लागेना

Onion Market : सोलापुरात कांदा खरेदीदार व्यापाऱ्याला आठ लाखांचा दंड

Sugarcane Bill : पावसाने खरीप वाया; ऊसबिलेही नाहीच

Grape Variety : द्राक्षाच्या नव्या वाणांच्या आयातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा

Mango Cashew Insurance : आंबा, काजू बागायतदारांना विमा परतावा जमा, वगळलेल्या ९ मंडलांनाही लाभ

SCROLL FOR NEXT