Russia Ukraine War Agrowon
ॲग्रो विशेष

युक्रेनला मदतीवरून ‘नाटो’मध्ये दोन गट

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु होऊन तीन महिने पूर्ण होत आले आहेत. रशियाने युद्ध सुरू केल्यानंतर आतापर्यंत यूक्रेनला मदत करणाऱ्या ‘नाटो’ देशांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

टीम ॲग्रोवन

कीव्ह : रशिया आणि यूक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युद्ध सुरु होऊन तीन महिने पूर्ण होत आले आहेत. रशियाने युद्ध सुरू केल्यानंतर आतापर्यंत यूक्रेनला मदत करणाऱ्या ‘नाटो’ देशांमध्ये (NATO) मतभेद निर्माण झाले आहेत. फ्रान्स आणि जर्मनी यांच्या नेतृत्त्वातील गटाने यूक्रेनला करण्यात येणाऱ्या मदतीला विरोध केला आहे. तर, अमेरिका यूक्रेनला शस्त्र पुरवठा आणि आर्थिक मदत करण्यावर ठाम आहे. फ्रान्स आणि जर्मनी यांच्या नेतृत्त्वातील गटाला रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध आणखी लांबण्याची शक्यता असल्याने खर्च वाढेल आणि आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. ‘नाटो’मध्येच दोन गट पडल्याने यूक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की (Zelinsky) यांना मोठा धक्का बसला आहे.

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धात रशियाकडून निर्माण होत असलेला दीर्घकालीन धोका आणि युद्धाच्या मैदानात रशियासमोर यूक्रेन कसे उभे राहणार यावरून फ्रान्स आणि जर्मनीच्या नेतृत्वातील गटाने प्रश्न उपस्थित केले आहेत. फ्रान्स आणि जर्मनीच्या नेतृत्त्वातील गट यूक्रेनला लांब पल्याची क्षेपणास्त्र देण्याविरोधात भूमिका घेतली आहे.

अमेरिका, ब्रिटन आणि उत्तर युरोपियन देशांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विस्तारवादी धोरणाची सुरुवात यूक्रेनवरील हल्ल्यापासून सुरू झाली आहे, असे वाटत आहे. रशिया यूक्रेनच्या भूमीचा वापर करून पाश्चिमात्य देशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी भीतीदेखील ‘नाटो’च्या काही सदस्य देशांना वाटत आहे. अमेरिका यूक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करण्याच्या बाजूने भूमिका घेत असला तरी फ्रान्स आणि जर्मनीने त्या विरोधात भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यापासून ‘नाटो’मधील सदस्य देशांमध्ये दोन गट पडले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT