Solapur Urea News : काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा सुमारे २५५ पोती युरिया घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडून संबंधित विक्रेता, खरेदीदार आणि संबंधित ट्रकमालकासह अकलूज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता. १८) अकलूज ते माळशिरस रस्त्यावर पाटीलवस्ती येथे ही कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, अकलूज ते माळशिरस रस्त्यावर पाटीलवस्ती येथून ट्रक क्रमांक- एमएच-४२, एक्यु १६८१ मध्ये विना पावती युरिया घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी तत्काळ हा ट्रक पकडून तो पोलिस ठाण्यात आणून लावला.
त्यानंतर पोलिसांनी कृषी विभागाचे खत निरीक्षक नितीन चव्हाण यांना ही माहिती कळवली. तसेच ट्रकमालक सोमनाथ बनसोडे (रा.वेळापूर) आणि चालक शाहीर दादासो काझी (रा. पिराची कुरोली) यांना ताब्यात घेत यांच्याकडे चौकशी केली असता. हा खत साई ॲग्रो, माळशिरस यांच्याकडून आणला असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह श्री. चव्हाण यांनी साई ॲग्रोच्या गोदामाची तपासणी केली. तेव्हा त्यात ट्रकमध्ये भरलेला युरिया आणि गोदामातील युरिया एकच असल्याचे आणि नवशाद इब्राहिम मुजावर (रा. पिराची कुरोली) यांना विक्रीसाठी पाठवत असल्याचे निदर्शनास आले.
पण त्यासाठी आवश्यक असणारी कोणतीच पावती व अन्य कागदपत्रे तसेच त्यावरील खुलासा योग्य न वाटल्याने हा युरिया काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी साई ॲग्रोचे मालक आशिष लोखंडे (माळशिरस), युरिया खरेदीदार नवशा इब्राहिम मुजावर (पिराची कुरोली) आणि ट्रकमालक सोमनाथ बनसोडे (रा. वेळापूर) यांच्यावर संगनमताने खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून युरियाचा तुटवडा निर्माण करण्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.