Employee Suspended Agrowon
ॲग्रो विशेष

Employee Suspended : भरारी पथकातील अनुपस्थित दोन कर्मचारी निलंबित

Bharari Pathak Action : निर्धारित वेळेत कर्तव्यावर हजर नसल्याचे आढळून आल्याने एक मंडळ अधिकारी व एक तलाठी अशा दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

 गोपाल हागे

Akola News : निर्धारित वेळेत कर्तव्यावर हजर नसल्याचे आढळून आल्याने एक मंडळ अधिकारी व एक तलाठी अशा दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी या बाबत आदेश काढले आहेत. निवडणुकीचे गांभीर्य ओळखून सर्व जबाबदार यंत्रणांनी काम करावे. निवडणूक कर्तव्यात एकही कसूर खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.

मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील भरारी पथक क्रमांक एकचे पथक प्रमुख तथा मंडळ अधिकारी महादेव सरप आणि पथकातील सदस्य जीवन राठोड यांनी कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केला. पथकप्रमुख मंडळ अधिकारी श्री. सरप हे निर्धारित वेळेत कर्तव्यावर हजर राहत नसल्याबाबत कळाले होते.

त्यांना मूर्तिजापूर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली व खुलासा मागवून चौकशी केली. श्री. सरप हे निर्धारित वेळेत नसल्याचे दिसून आले. श्री. सरप यांनी स्वत: उपस्थित राहण्यासह पथकाच्या सर्व सदस्यांना उपस्थित ठेवणे व दिलेल्या कालावधीत गस्त घालणे अपेक्षित होते. तथापि, ते रात्री एक ते तीन दरम्यान अनुपस्थित होते.

त्याचप्रमाणे, तलाठी जीवन राठोड हेही रात्री साडेबारा वाजेनंतर पथकासोबत नव्हते. दोन्ही कर्मचाऱ्यांनी कर्तव्य न पाळल्यामुळे श्री. सरप व श्री. राठोड या दोघांनाही महाराष्ट्र नागरी सेवा अन्वये निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत दोघांचेही मुख्यालय अकोला तहसील कार्यालय देण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT