Mango Festival Sangli agrowon
ॲग्रो विशेष

Mango Festival Sangli : सांगलीतील आंबा महोत्सवात ३३ लाखांवर उलाढाल

Mango Festival : सांगली येथील बाजार समितीत गुरुवार (ता. ८) ते सोमवार (ता. १२) या पाच दिवसांच्या महोत्सवात सुमारे १७ स्टॉलवर शेतकरी आंबा विक्रीसाठी घेऊन आले.

sandeep Shirguppe

Sangli Amba Mahotsav : महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यातर्फे सुरू असलेल्या आंबा महोत्सवात सोमवारी (ता. १२) शेवटच्या दिवशी सव्वा चार लाख रुपयांची तर पाच दिवसांत सुमारे ३३ लाख ६० हजार रुपयांची उलाढाल झाली.

सांगलीमध्ये आंबा महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. यंदा तासगाव आणि आटपाडी या दोन तालुक्यांमध्ये आंबा महोत्सव झाला. या दोन्ही तालुक्यांतही आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली येथील बाजार समितीत गुरुवार (ता. ८) ते सोमवार (ता. १२) या पाच दिवसांच्या महोत्सवात सुमारे १७ स्टॉलवर शेतकरी आंबा विक्रीसाठी घेऊन आले. रत्नागिरी, देवगड हापूससह सांगली जिल्ह्यामध्ये उत्पादित होणाऱ्या विविध २० हून अधिक आंब्याच्या जातींची विक्री या महोत्सवात झाली.

माळशिरस, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण, पेड, तासगाव, खानापूर, मिरज तालुक्यातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपले स्टॉल लावले होते. देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, केसर, रत्ना, जरदाळू, मल्लिका, खोबरी, राजापुरी, दूध पेढा, नीलम, सोनपरी, तोतापुरी, साखरगोटी, मलगोबा, रायवळ, यासह विविध प्रकारच्या आंब्याच्या जाती येथे विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

यावेळी पणन महामंडळाचे कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, पणन अधिकारी ओंकार माने उपस्थित होते.खुडूस (ता. माळशिरस) येथील शेतकरी डॉ. केशव सरगर म्हणाले, ‘पणन महामंडळाच्या सर्व ठिकाणच्या महोत्सवात मी स्टॉल लावतो. इतर ठिकाणांसारखाच सांगलीकरांनीही या महोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला. ग्राहकांना थेट आंबा विक्रीमुळे चांगला दर मिळाला आहे. सहभागी शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, जिल्हा पणन अधिकारी ओंकार माने या दोघांच्या हस्ते देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mulshi Dam: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद

Ranbhaji Festival: हरितोत्सवासोबत रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद

Jalna Scam: जालना जिल्ह्यात २४ कोटींच्या घोटाळ्यात २८ जणांवर गुन्हे दाखल

Cotton Crop Protection: पावसानंतर कपाशीवरील रोग आणि किडींचे व्यवस्थापन

Dharashiv Rain: धाराशिव जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करा

SCROLL FOR NEXT