Turmeric Market
Turmeric Market Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Market : हिंगोलीत हळदीच्या आवकेत गतवर्षीपेक्षा १२ हजार क्विंटलने वाढ

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC, Hingoli) अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षामध्ये एकूण १ लाख ९४ हजार ३२३ क्विंटल हळदीची आवक (Turmeric Arrival) झाली. वर्षभरात क्विंटलला सरासरी ६५६६ रुपये दर मिळाले.

गतवर्षीच्या (२०२१-२२) च्या तुलनेत हळदीच्या आवकेत १२ हजार ८९१ क्विंटलने वाढ झाली आहे.

यंदाच्या हंगामातील नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. सोमवारी (ता. १७) हळदीची २९०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२१० ते कमाल ६४५१ रुपये, तर सरासरी ५८५५ रुपये दर मिळाले.


हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये हिंगोली जिल्हा, तसेच शेजारील नांदेड, परभणी हे जिल्हे विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अमरावती, बुलडाणा आदी जिल्ह्यांतून हळदीची आवक होते.

मोठ्या प्रमाणावर आवक येते. जाहीर लिलावाद्वारे खरेदी केली जाते. सध्या आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार हे तीन दिवस हळदीची आवक घेतली जात आहे. परंतु हळदीची आवक वाढली आहे.

त्यामुळे लिलाव, वजनमापाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आगामी मे महिन्यापासून आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस हळदीची आवक घेण्यासाठी बाजार समिती प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.

२०२२-२३ या आर्थिक वर्षात हळदीची एकूण १ लाख ९४ हजार ३२३ क्विंटल आवक झाली. गतवर्षी एप्रिल महिन्यात सर्वाधिक प्रतिक्विंटल सरासरी ७२९० रुपये तर ऑक्टोबर महिन्यात सर्वांत कमी प्रतिक्विंटल सरासरी ६१७४ रुपये दर मिळाले.

वर्षभरात प्रतिक्विंटल सरासरी ६५६६ रुपये दर मिळाले.२०२१-२२ या आर्थिक वर्षात हळदीची एकूण १ लाख ८१ हजार ४३२ क्विंटल आवक झाली होती.

त्या वर्षी प्रतिक्विंटल सरासरी ७१५९ रुपये दर मिळाले होते. २०२२ च्या जानेवारी महिन्यात सर्वाधिक म्हणजेच प्रतिक्विंटल ८७४० रुपये सरासरी दर होते.

संत नामदेव हळद मार्केट २०२२-२३ वर्षभरातील आवक व सरासरी भाव
महिना...आवक क्विंटल...सरासरी भाव
एप्रिल...१६०५९...७२९०
मे...२०६३०...६७७७
जून...१६९४५...६६६९
जुलै...२१८३०...६६४९
ऑगस्ट...९६८५...६४९२
सप्टेंबर...१४४५४...६३१७
ऑक्टोबर...९२३५...६१७४
नोव्हेंबर...१६०९४...६६५०
डिसेंबर...१६५३५...६६८४
जानेवारी...१८८४६....६५३६
फेब्रुवारी...१३२६०...६३१३
मार्च...२०७५०...६२४६


मराठवाडा, विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे येत्या मे महिन्यापासून आठवड्यातील पाच दिवस हळदीची आवक घेण्यात येईल. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.
- नारायण पाटील,
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT